‘बविआ’कडून सर्व कार्यक्रम रद्द
वसई, ता.२८ (बातमीदार)ः वसई तालुक्यात बहुजन विकास आघाडीतर्फे होणारे विविध कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने सर्व नगरसेवकांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे.
वसई पूर्व ग्रामीण भागातील कामण येथे १ हजार मुलींना कपडे वाटप तसेच २१ नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ होणार होता. पण अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त येताच सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती नगरसेवक सुनील आचोळकर यांनी दिली. वसई तालुक्याच्या विकासाला प्राधान्य देणारे अजित पवार काळाच्या पडद्याआड केल्याने बहुजन विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी हा निर्णय घेतला आहे. वसई तालुक्यातील पाणी, वीज, अनेक सुविधांसाठी माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सुचवलेल्या अनेक कामांना त्यांनी मंजुरी दिली होती. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील जनमानसात त्यांच्याबद्दल विशेष प्रेम असल्याची भावना जनमानसातून उमटत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.