मुंबई

रोह्यात जि.प.च्या ४ जागांसाठी १४ जण तर पं.स. च्या ८ जागांसाठी २५ रिंगणात

CD

रोहा तालुक्यात निवडणूक रणधुमाळीला सुरुवात
रोहा, ता. २७ (बातमीदार) ः जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. जिल्हा परिषदेच्या गटांसाठी १४ उमेदवार, तर पंचायत समितीच्या आठ गणांसाठी २५ उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात उतरले आहेत.
भुवनेश्वर, आंबेवाडी व नागोठणे गटात राष्ट्रवादी-भाजप युती झाली असून, त्यांच्याविरोधात शिंदे गट आणि ठाकरे गट असा सामना रंगणार आहे, तर घोसाळे गटात मात्र भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप आमनेसामने लढत होणार असल्याने उमेदवारांची प्रतिष्ठा व पक्षाचे अस्तित्व पणाला लागले आहे. घोसाळे गटातील लढत चुरशीची ठरणार असून, येथे सर्वच प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. भाजपकडून सुश्रुता पाटील, ठाकरे गटाच्या संचिता फुलारे, शिंदे गटाच्या उर्वशी वाडकर, राष्ट्रवादीकडून रोहिणी सकपाळ, शेकापच्या वैष्णवी ठाकूर या उमेदवारांमध्ये पंचरंगी लढत होणार आहे. भुवनेश्वर येथे राष्ट्रवादीचे मधुकर पाटील, शिवसेना संदेश मोरे, ठाकरे गटाचे नितीन वारंगे यांच्यात सामना रंगणार आहे.
पंचायत समितीच्या आठ जागांसाठी ६३ पैकी ३८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. आता २५ उमेदवारांमध्ये लढत होईल. न्हावे गण येथे शिवसेनेकडून, भाजप सिद्धिका धसाडे आणि राष्ट्रवादी शिवानी म्हात्रे यांच्यात चुरस असून, शेकापच्या रुपाली मढवी व अपक्ष वृषाली म्हात्रे यांनीही आव्हान उभे केले आहे. घोसाळे गणात सहा उमेदवार रिंगणात असून, शिंदे गट, भाजप, ठाकरे गट, राष्ट्रवादी, शेकाप आणि अपक्ष असा बहुरंगी सामना होणार आहे. तर, नागोठणे, सुकेली, कोलाड, आंबेवाडी, धाटाव आणि भुवनेश्वर गणांमध्येही शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी-भाजप युती असा थेट संघर्ष पाहायला मिळणार आहे.

भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर
भाजप-राष्ट्रवादी युतीमुळे रोह्यात भाजप कार्यकर्ते पक्षश्रेष्ठींसमोर हतबल झाल्याचे दिसून आले. रोह्यात भाजप कार्यकर्त्यांमध्ये वरिष्ठांच्या निर्णयामुळे मोठी नाराजी दिसून येत आहे. पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरून भाजपच्या अनेक उमेदवारांना आपले अर्ज मागे घ्यावे लागले. भाजपचे ज्येष्ठ नेते सतीश धारप रोह्यात सकाळपासून अमित घाग यांची उमेदवारी मागे घेईपर्यंत ठाण मांडून बसले होते. दरम्यान, रोहा तालुक्यात शेकाप फक्त घोसाळे गट व पंचायत समिती गणातील तीन उमेदवार लढणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Husband Attacks Wife Friend : नाशिकच्या गोदाघाटावर रक्ताचा सडा! पत्नीला मित्रासोबत फिरताना पाहून पतीनं जे केलं, ते पाहून तुम्हीही हादरून जाल

Nashik Krushikumbh : नाशिकमध्ये 'कृषिकुंभ-२०२६'चा जागर! एआय तंत्रज्ञान आणि आधुनिक शेतीचे मिळणार धडे

E- Sakal No.1 Marathi News Protal : डिजिटल युगात मराठी पत्रकारितेचा दबदबा; कॉमस्कोरमध्ये ई-सकाळची कामगिरी नंबर 1

Sangli Zilla Parishad Politics : सांगली जिल्हा परिषदेत ‘व्हीप’वरून अजित पवार गटात दुफळी, जिल्हाध्यक्षांकडे झेडपी अध्यक्ष; जयंत पाटलांची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद नसता तर मला ही संधी मिळाली नसती - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

SCROLL FOR NEXT