रस्ते सुरक्षा मोहिमेला वेग
विठ्ठलवाडी वाहतूक पोलिस सक्रिय
उल्हासनगर, ता. २८ (बातमीदार) : येत्या २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या श्री मलंगगड यात्रेच्या पार्श्वभूमीवर, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विठ्ठलवाडी वाहतूक उपविभागाची टीम सक्रिय झाली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या नेतृत्वाखाली नेवाळी नाका आणि परिसरातील वाहतुकीचे अडथळे दूर करण्यासाठी उपाययोजना राबवण्यात येत आहेत.
नेवाळी नाका परिसरात अनेक ठिकाणी अनधिकृत कट्समुळे वाहने ‘राँग साईड’ने येत होती, ज्यामुळे मोठी कोंडी होत असे. ही समस्या सोडवण्यासाठी पोलिसांनी जेसीबीच्या सहाय्याने खालील ठिकाणचे अनावश्यक कट्स सिमेंट ब्लॉक टाकून बंद केले आहेत. साईकृपा सर्व्हिस सेंटरजवळील कट, जिया मोबाईल शॉपसमोरील कट, गणपती मंदिर आणि महालक्ष्मी विद्यालयसमोरील कट तसेच, ग्रीन लीफ हॉटेल आणि नायरा पेट्रोलपंपसमोरील कट्सवर प्लॅस्टिक ड्रममध्ये माती भरून व बॅरिकेट्स लावून तात्पुरती बंदी करण्यात आली आहे.
पीए सिस्टीमद्वारे जनजागृती
बदलापूर-कटई हायवे आणि तळोजा रोडवरील उसाटणे, कमल मोटर्स, डावलपाडा आणि आत्माराम नगर अशा संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी विशेष बॅनर्स लावले आहेत. ‘‘राँग साईडने वाहन चालवल्यास नवीन भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यानुसार कडक गुन्हे दाखल करण्यात येतील,’’ असा इशारा ‘फिटर मोबाईल’च्या पीए सिस्टीमद्वारे अनाउन्समेंट करून दिला जात आहे. ही मोहीम पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट, सहाय्यक आयुक्त किरण बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पडवळ, उपनिरीक्षक राजू मराडे, शिवाजी पाटील आणि त्यांच्या पथकातील नितीन शिंदे, चंद्रशेखर बोरसे, नरेंद्र बागुल यांच्यासह पोलिस मित्र आणि वार्डन यांनी राबवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.