मुंबई

वागळे इस्टेटमधील बंद कंपनीत चोरी करणारी चौकडी जेरबंद

CD

वागळे इस्टेटमधील बंद कंपनीत चोरी करणारी चौकडी जेरबंद
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : शहरातील वागळे इस्टेट परिसरात एका बंद कंपनीतील चोरी करणाऱ्या चौकडीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. विशाल जाधव (२६), अलाउद्दीन सय्यद (२८), अक्षय क्षिरसागर (२९) व संजय किरके (२६) या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले. या चोरीत सुमारे एक लाख ५० हजार रुपयांचा माल लंपास केल्याची कबुली त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
वागळे इस्टेट रूपादेवी पाडा येथे एन.आर.डब्ल्यू. पॉलिमर्स प्रा.लि. कंपनीचे मॅनेजर धर्मेश सोनावणे (२९) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. ही कंपनी मागील एक महिन्यापासून बंद असून तिची देखरेख सोनावणे करत असून एक सुरक्षारक्षक आहेत. सोमवारी (ता. २६) सोनावने कंपनीच्या पाहणीस गेले असता काचेच्या खिडक्या फुटलेल्या, ॲल्युमिनियमचा दरवाजा तुटलेला व शटर उघडे असल्याचे आढळून आले. म्हणून आत तपासणी केली असता लोखंडी सळई, लोखंडी पाण्याचे पाईप, ॲल्युमिनियम पट्ट्या व वायरिंग असा दीड लाखांचा माल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. सोनावणे व त्यांच्या मित्रांनी घटनास्थळी नजर ठेवली असता, मंगळवारी (ता. २७) चार व्यक्ती कंपनीत चोरी करताना आढळून आले. याबाबत तात्काळ वागळे इस्टेट पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल होत चौघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी यापूर्वीही चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: ५८ व्हिडिओनंतर नवा धक्का... कॅप्टन खरात प्रकरणात SIT ची स्थापना, मध्यरात्री फार्महाऊसमध्ये काय सापडलं?

Success Story: जिद्द, परिश्रमाच्या जोरावर उभारली उत्तुंग यशाची गुढी; कोमल ढवळे यांची सहाय्यक राज्य कर आयुक्त पदावर झेप!

जॉस बटलर निवृत्ती घेणार? T20 World Cup मधील खराब कामगिरीवर अखेर सोडलं मौन; म्हणाला, 'जसं असेल, तसं...'

धुरंधर २ रिलीज होताच दिग्दर्शकाला मागावी लागली माफी, म्हणाले...'आम्ही रात्रभर प्रयत्न करुनही...'

Gold Rate Today: गुढीपाडव्याच्या शुभमूहर्तावर सोन्याच्या भावात मोठी घसरण! सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT