मुंबई

अंजली भारती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा

CD

भिवंडी, ता. २८ (वार्ताहर) : भंडारा येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात अंजली भारती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप भिवंडी शहर महिला आघाडीच्या वतीने अंजली भारती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
भाजप भिवंडी शहर महिला अध्यक्षा कल्पना शर्मा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निजामपूर पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक विश्वास डगळे यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन सादर केले. या निवेदनात अंजली यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शिष्टमंडळात माजी महिला अध्यक्षा सुनीता टावरे यांच्यासह महिला पदाधिकारी सत्वशील जाधव, रेखा पाटील, विभा पाटील, मानसी राजे, यशवंती बिलवा, वैशाली पाटील, अक्षता मोईली समावेश होता. या वेळी बोलताना महिला अध्यक्षा कल्पना शर्मा म्हणाल्या, अंजली भारती यांनी केलेले आक्षेपार्ह विधान केवळ अमृता फडणवीस यांचाच नव्हे, तर संपूर्ण महिला वर्गाचा अपमान करणारे आहे. महिला म्हणून आम्ही या वक्तव्याचा तीव्र निषेध करीत आहोत. संबंधितांवर तत्काळ गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्यात यावी. या निवेदनामुळे परिसरात या प्रकरणाबाबत चर्चा रंगली आहे. पोलिसांकडून पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी अर्धशतक! गौतम, रोहित, विराटच्या विक्रमाशी बरोबरी; इशानसह ९७ धावा जोडल्या

बीएमसी जिंकताच भाजपची मोठी चाल! मुंबईत ८१ सदस्यीय नवी फौज तयार; टीममध्ये उत्तर भारतीयांचा बोलबाला, कुणाकडे कोणती जबाबदारी?

आपला स्वतःचा चित्रपट आहे असं समजून... आगामी 'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल काय म्हणाला रितेश देशमुख

Phulambri News : सुवर्ण महोत्सवी सप्ताहात नामस्मरणाचा अखंड गजर, शेलगाव खुर्द येथे हजारो भाविकांची उपस्थिती; काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता

Kej Bus Accident : केज-कळंब रोडवर एसटी बसचा भीषण अपघात; चालक-वाहकासह १३ प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT