मुंबई

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला मुदतवाढ

CD

शहापूर, ता. २८ (वार्ताहर) : ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढवून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती; तसेच जिल्हा परिषदांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ पुरस्कार योजनेला सरकारने ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
२०२५-२६ या आर्थिक वर्षापासून राबविण्यात येत असलेल्या या अभियानाला ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, कल्याण, भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यांतील ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळत असून अनेक ग्रामपंचायती सहभागी होण्यास उत्सुक आहेत. या मुदतवाढीसाठी सरपंच संघटनेच्या वतीने सरकारकडे सातत्याने पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात आला होता. अनेक गावांमध्ये एका ग्रामसेवकाकडे दोन किंवा अधिक ग्रामपंचायतींचा प्रभार असल्यामुळे करवसुली, नोंदी अद्ययावत करणे; तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत करण्यात अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायतींना आवश्यक तयारीसाठी अतिरिक्त वेळ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या अभियानांतर्गत ग्रामपंचायतींचे मूल्यमापन करवसुली, स्वच्छता, पाणीपुरवठा, नोंदवही व्यवस्थापन, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आदी विविध निकषांवर करण्यात येणार आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्कार आणि सन्मान देऊन त्यांना प्रोत्साहन दिले जाणार असल्याने ग्रामीण भागातील प्रशासन अधिक सक्षम व गतिमान होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Funeral News LIVE Updates : अजित पवारांच्या पार्थिवावर 11 वाजता अंत्यसंस्कार

Ajit Pawar: “अरे बेट्यांनो… इतक्या लवकर मी जात नसतो!” ; अजितदादांचा शेवटचा निरोप, AI व्हिडिओ पाहून डोळे पाणावले

Ajit Pawar Funeral : दादांना भेटायची ही शेवटची पहाट... अजित पवारांच्या आठवणीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा अश्रूंचा बांध फुटला

अजितदादांनी ऐकलं नाही! रात्रीच कारने बारामतीला जाऊया म्हणालो होतो; चालक श्यामराव मनवेंना अश्रू अनावर

Ajit Pawar : लोकनेता गमावला; विविध मान्यवर नेत्यांकडून श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT