मुंबई

वातावरण बदलामुळे घशात संसर्ग अन् श्वसनाच्या तक्रारी

CD

घसा अन् श्वसनाच्या तक्रारींत वाढ
हवामान बदलाचा परिणाम

वाशी, ता. २८ (बातमीदार) : नवी मुंबई शहरात दिवसा उन्हाचा चटका अन् रात्री अचानक वाढणारी थंडी यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होताना दिसत आहे. बदलते हवामान, तापमानातील सततच्या चढ-उतारामुळे श्वसनविकाराच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. पालिकेच्या रुग्णालयासह खासगी दवाखान्यांत घसा आणि श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
सध्या दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात मोठा फरक जाणवत आहे. दिवसा कोरडी आणि उष्ण हवा, तर रात्री थंड व दमट वातावरण असते. त्याचा परिणाम येथील नागरिकांवर होत आहे. हवामानातील बदलामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन संसर्ग होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात रुग्णालयांत उपचार घेत आहेत. या हवामान बदलाचा विशेष परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह दमा, ॲलर्जी आजारांनी बाधित रुग्णांवर होत आहे. ओपीडीमध्ये घशात खवखव, कोरडा खोकला, श्वास घेण्यास त्रास अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
सध्याच्या वातावरणात किरकोळ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. सर्दी, खोकला किंवा श्वसनाचा त्रास दोन-तीन दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा. विशेषतः दमा व ॲलर्जीच्या रुग्णांनी नियमित औषधोपचार सुरू ठेवावेत, असे जनरल फिजिशियन डॉ. प्रतीक तांबे यांनी सांगितले.

आजाराची लक्षणे

घशात खवखव किंवा दुखणे, सर्दी, नाक वाहणे, कोराडा किंवा कफयुक्त खोकला, श्वास घेताना घरघर, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा अशी लक्षणे या आजाराची आहेत.


काय काळजी घ्यावी?

सर्दी-खोकला, ताप किंवा श्वसनाचा त्रास होत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मास्कचा वापर करावा, हातांची स्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे. वेळेवर निदान झाल्यास आणि योग्य उपचार केल्यास प्रभावीपणे नियंत्रण मिळवता येईल, असे आरोग्यतज्ज्ञांचे मत आहे. कोमट पाणी पिणे, वाफ घेणे व मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे, हलका, पौष्टिक आहार घेणे.

फोटो - 860

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Asthi Visarjan : अजित दादांचे अस्थी विसर्जन, पार्थ व जय पवार यांच्याकडून अस्थी विसर्जन विधी संपन्न

Angarak Yog 2026: अंगारक योग तयार! फेब्रुवारीत ‘या’ राशींच्या अडचणी वाढू शकतात

Latest Marathi News Live Update : अमरावतीत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

UGC नियमांवर वाद का पेटला? नवा 3(C) आणि जुना 3(E) यातील फरक समजून घ्या

वर्गात आरसा आणला म्हणून ७वीच्या विद्यार्थिनीला स्टीलच्या स्केलने अमानुष मारहाण; शिक्षिकेवर गुन्हा; नागपुरातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT