मुंबई

ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

CD

नवी मुंबई, ता. २८ (वार्ताहर) : नवी मुंबई परिसरात ऑनलाइन सेक्स रॅकेट चालवणारी टोळी उद्ध्वस्त करण्याची कामगिरी नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ऑनलाइन सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या एजंटसह चौघांना अटक केली आहे. तसेच या एजंटने वेश्याव्यवसायासाठी नेरूळ येथील एका घरामध्ये ठेवलेल्या चार पीडित महिलांची सुटका केली आहे.

या प्रकरणातील आरोपींनी ऑनलाइन सेक्स रॅकेट चालवण्यासाठी एक संकेतस्थळ तयार केले होते. या स्थळावर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर ग्राहकाने संपर्क साधताच संशयित व्हॉट्सॲपच्या माध्यमातून त्यांना मुलींचे फोटो पाठवून व्यवहार ठरवत असत. या ऑनलाइन सेक्स रॅकेटबाबतची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार २३ जानेवारीला पोलिसांनी बनावट ग्राहकाद्वारे ऑनलाइन सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीने सुरू केलेल्या वेबसाईटवर संपर्क साधला असता, त्याला व्हॉट्सॲपद्वारे मुलींचे फोटो पाठवून सौदा ठरवण्यात आला. संशयितांनी सांगितल्यानुसार बनावट ग्राहकाने नेरूळ सेक्टर-१३ मधील एका हॉटेलमध्ये रूम बुक केल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे व त्यांच्या पथकाने हॉटेलजवळ सापळा लावला होता. रात्रीच्या वेळी हबिबुर खालेक गाझी (वय २०) हा मोटारसायकलवरून एका महिलेला घेऊन हॉटेलमध्ये आल्यानंतर महिलेने क्युआर कोडद्वारे बनावट ग्राहकाकडून पैसे स्वीकारले. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने बनावट ग्राहकाच्या इशाऱ्यानंतर हॉलेवर छापा मारला.

पोलिसांनी वेश्यागमनासाठी आलेल्या महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता, तिला शंभू नावाच्या एजंटने पाठवल्याचे सांगितले. तसेच तिच्यासह आणखी तीन मुली सारसोळे गावात राहत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सारसोळे येथे जाऊन मुली पुरवणारा एजंट शंभू मुन्नीलाल उपाध्याय (३३) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने सदर वेबसाईट व मोबाईल नंबर हा राकेश चालवत असून तो, मकबुल अन्सारी याच्या मागणीप्रमाणे व ऑनलाईन आलेल्या बुकिंगप्रमाणे मुली पुरवत असल्याचे सांगितले. तसेच धिरु हा मॅनेजर म्हणून काम पाहत असल्याचे सांगितले. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीतील सात जणांविरोधात नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT