आज राबोडीत कडकडीत बंद
अजित पवारांना अर्पण करणार श्रद्धांजली
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : जिल्हा परिषदेच्या प्रचारानिमित्त बुधवारी (ता.२८) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून विमानाने बारामतीकडे रवाना झाले. यावेळी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमान अपघातग्रस्त झाले. यामध्ये अजित पवार यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यानंतर ठाण्यातील राबोडी परिसरात राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास देसाई यांनी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गुरुवारी (ता. २९) राबोडी बंदची हाक दिली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचा निवडणुकीनिमित्त बुधवारी बारामती दौरा होता. या दौऱ्यासाठी बुधवारी सकाळी त्यांनी बारामतीकडे प्रस्थान केले होते. बारामतीमध्ये विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमान अपघातग्रस्त झाले. खराब हवामान आणि तांत्रिक बिघाडामुळे विमान नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळले. विमानात अजित पवार यांच्यासह सहा जण होते आणि या सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील इतर काही प्रवाशांचाही मृत्यू झाल्याची माहिती आली. त्यांच्या निधनाची वार्ता हवेच्या वेगासारखी पसरली आणि संपूर्ण महाराष्ट्रावर दुखाचे सावट कोसळले. अजित पवार यांच्या निधनाची बातमी समजताच राष्ट्रवादी पक्षावर शोककळा पसरली आहे. त्याची पार्श्वभूमीवर अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राबोडी गुरुवारी बंद ठेवावी, असे भावनिक आवाहन नगरसेवक सुहास देसाई यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.