मुंबई

SIILC २८/०१/२०२६

CD

SIILC २८/०१/२०२६

BPMS पोर्टल ऑनलाइन प्रशिक्षण
आजच्या डिजिटल युगात बांधकाम परवानग्यांची प्रक्रिया अधिक वेगवान व पारदर्शक झाली आहे. अशा वेळी BPMS पोर्टल व PREDCR प्रणाली समजून घेणे हे वास्तुविशारद, स्थापत्य अभियंते व नगर नियोजकांसाठी अत्यावश्यक झाले आहे. २ फेब्रुवारीपासून सुरू होणारे BPMS पोर्टल ऑनलाइन प्रशिक्षण हे व्यावसायिक कौशल्य वाढवण्याची उत्तम संधी आहे. केवळ एका महिन्यात UDCPR नियोजन नियम, बिल्डिंग परमिशन प्रक्रिया, योग्य ड्रॉइंग सबमिशनसाठी स्किल्स आणि PREDCR टेस्टिंग यांसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांवर प्रभुत्व मिळवणे शक्य आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तीन महिन्यांसाठी व्हाट्सॲप सहाय्य, रेकॉर्ड केलेल्या सत्रांना आजीवन प्रवेश, टीपी क्लायंट सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशन व तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल.

सरकारी इस्टिमेशन प्रशिक्षण
शासकीय कामांचे मूल्यनिर्धारण, इस्टिमेशन हे बांधकाम, स्थापत्य विभागातील, कंत्राटदार, विद्यार्थी तसेच अभियंता, पर्यवेक्षक व शासकीय अधिकारी यांना उपयुक्त असे ऑनलाइन प्रशिक्षण ९ फेब्रुवारीपासून आयोजिले आहे. प्रशिक्षणात सार्वजनिक बांधकाम विभाग, एसएसआर, रेट, नियमावली, टेस्टिंग, व्यवस्थापन पत्रक, रेट तपासणी, चार्ट, इस्टिमेशन सॉफ्टवेअर व इस्टिमेशन बनविणे, तयार करणे, समाज मंदिर, सभा मंडप, शाळा, अंगणवाडी, सुरक्षा भिंत अशा प्रकारची कामे व इस्टिमेशन आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल. या प्रशिक्षणामुळे सहभागींना प्रत्यक्ष कामकाजातील कौशल्य, खर्च नियंत्रण आणि तांत्रिक ज्ञान अधिक प्रभावीरीत्या आत्मसात करण्यास मदत होईल.

शासकीय ई-निविदा प्रक्रिया प्रशिक्षण
विविध शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक विश्वस्त संस्था, देवस्थाने आता ई-निविदा प्रक्रिया राबवत आहेत. याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारे दहा दिवस चालणारे ऑनलाइन प्रशिक्षण ९ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. प्रशिक्षणात विविध विभागातील नोंदणी, न दिसणाऱ्या निविदासुद्धा कशा शोधायच्या, बीओक्यू भरताना येणाऱ्या अडचणी, निविदा प्रक्रियेला लागणारी कागदपत्रे, कागदपत्रे डिजिटली सही करून कशी सादर करायची, इएमडी व एसडी मध्य सूट कशी मिळवायची, स्वतःकडे यंत्रे व साहित्य नसतील तर करावयाचे भाडे करार, निविदापूर्व बैठकीला जाण्यापूर्वी करावयाच्या १५ महत्त्वपूर्ण गोष्टी कोणत्या याबाबत तसेच इतर महत्त्वाच्या तांत्रिक गोष्टींबद्दल सविस्तर मार्गदर्शन होणार आहे.

वास्तुशास्त्र कार्यशाळा
वास्तुशास्त्रानुसार घर, ऑफिस वा दुकान कसे असावे इ. बाबत माहिती करून देणारी ऑनलाइन कार्यशाळा १० फेब्रुवारीपासून आयोजिली आहे. घर वास्तू दोषमुक्त असावी ही इच्छा बाळगणाऱ्या सर्वांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे. कार्यशाळेत वास्तुशास्त्र काय आहे, वास्तुदोष कोणते आहेत, त्याचे परिणाम कोणाला जाणवतात, दिशा, उपदिशा, अधिपती देवता आणि पंचतत्व, दिशा आणि प्रभाव, वास्तुपुरुष मंडल, मर्मस्थान, उपमर्मस्थान, जमीन कशी निवडावी, घर नक्की कोठे व कसे बांधले पाहिजे, घर बांधण्यास प्रारंभ कसा करावा, घरातील अंतर्गत रचना कशी असावी, मुख्य दरवाजाची दिशा ओळखणे, दरवाजा कोठे करावा, वास्तुचे आयुष्य आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.

‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ८४८४८११५४४, ८९५६३४४४७२, ८९५६३४४४७१, ९३५६९७३४२७
क्यूआर कोड ः

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

IPL 2026 Marathi News: कदाचित महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा, तो पिवळ्या जर्सीत पुन्हा दिसणार नाही !

Student Emotional Story : 'आई-वडील या जगात नाहीत..', चिमुरड्याचे 'ते' शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी; शिक्षकानं त्याच्यासोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम!

SCROLL FOR NEXT