मुंबई

अधिकारी महासंघाचा आधारस्तंभ हरपला

CD

वाशी (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मार्गदर्शक, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत निधन झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. या घटनेमुळे राज्याचे अपूरणीय सामाजिक व राजकीय नुकसान झाले आहे, अशी भावना महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने व्यक्त केली आहे.

देशातील महत्त्वाकांक्षी ‘महाराष्ट्र’ या पुरोगामी राज्याचे उपमुख्यमंत्री, तसेच वित्त व नियोजन मंत्री म्हणून अजित पवार यांनी राज्याचा कारभार दीर्घकाळ अत्यंत सक्षमपणे सांभाळला. एक कर्तव्यदक्ष प्रशासक, लोकाभिमुख नेतृत्व आणि निर्णयक्षम व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. वेळेचे महत्त्व ओळखणारे, भल्या पहाटे कामाला लागणारे, कामातील प्रचंड शिस्त व प्रशासनावर जबरदस्त पकड असलेले नेतृत्व म्हणून अजित पवार यांचा प्रशासनावर मोठा प्रभाव होता. राज्यातील अधिकारी वर्गाच्या विविध मागण्या, प्रश्न तसेच अधिकारी महासंघाच्या कल्याणकारी उपक्रमांसाठी त्यांनी नेहमीच मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य दिले. अजित पवार यांचे जाणे म्हणजे अधिकारी महासंघाचा एक मजबूत आधारस्तंभ हरपल्यासारखे असून त्यांच्या निधनाने महासंघासह प्रशासकीय यंत्रणेला मोठा धक्का बसला आहे, असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT