मुंबई

बीएमडी तपासणी शिबिर

CD

के. एल. पोंदा हायस्कूलमध्ये बीएमडी तपासणी शिबिर
कासा, ता. २८ (बातमीदार) : डहाणू एज्युकेशन ट्रस्ट संचलित के. एल. पोंदा हायस्कूलच्या शताब्दी महोत्सवानिमित्त शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी विशेष बोन मिनरल डेनसिटी (बीएमडी) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी (ता. २८) बटुकभाई पोंदा सभागृहात सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर पार पडले.
उपाध्यक्ष अजय बाफना व विश्वस्त डॉ. रोहित भंसाली यांच्या संकल्पनेतून, संस्थेच्या सर्व विश्वस्त व कार्यकारिणी सदस्यांच्या प्रेरणेतून आणि मुख्याध्यापक सोपान इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील आजी-माजी शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी डहाणूतील सुप्रसिद्ध डॉ. संजय सोहनी, डॉ. एस. जी. भंसाली, डॉ. लक्ष्मण सोनावणे, डॉ. आदित्य अहिरे यांची उपस्थिती लाभली. तसेच विनोद शिरसाठ (मॅनेजर, मेयर विटाबायोटिक्स, मुंबई), श्री आदर्श मिश्रा (टेक्निशियन) व अभिषेक आंद्रे (टेक्निशियन) यांनीही तांत्रिक सहकार्य केले. शिबिरात एकूण १०१ शिक्षक व कर्मचाऱ्यांची कॅल्शियम पातळी व हाडांची घनता तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान प्रत्येक कर्मचाऱ्याची वैयक्तिक तपासणी करून हाडांची मजबुती, कॅल्शियमची पातळी, आहाराच्या सवयी व दैनंदिन जीवनशैली याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. गरजेनुसार योग्य आहार, नियमित व्यायाम, जीवनशैलीतील बदल आणि औषधोपचारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी समुपदेशन केले.
संस्थेचे अध्यक्ष तरुण पोंदा यांच्या अध्यक्षतेखाली, मानद सचिव सुधीर कामत, कोषाध्यक्ष सुनील पोंदा व विश्वस्त डॉ. रोहित भंसाली यांच्या उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा उपक्रम संस्थेच्या कर्मचारीहितैषी व समाजाभिमुख धोरणाचे प्रतीक ठरला. या शिबिरामुळे आरोग्याविषयी जागरूकता वाढल्याची भावना सहभागी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War : इराणवर भारतीय तळांवरून हल्ले? अमेरिकन कर्नलच्या दाव्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचं निवेदन, काय आहे सत्य?

'शुटिंग करताना अचानक मोठे स्फोट झाले अन्...' दुबईत अडकलेल्या लारा दत्तने सांगितला भंयकर प्रसंग, सत्य परिस्थिती सांगताना अश्रू अनावर

Date Prices Rise : रमजानच्या पार्श्वभूमीवर सांगलीत खजुरांना मोठी मागणी; दरात १० टक्क्यांची वाढ, बाजारात विविध देशांतील खजूर उपलब्ध

Healthy Laddu Recipe: साखर न वापरताच बनवता येतात 'हे' लाडू; लहानांपासून मोठ्यांपर्यंत अन् डायबेटिक पेशंटही खाऊ शकतील

Sugarcane Field Fire Tragedy : उसाच्या फडात होरपळून वृद्धाचा मृत्यू, शेतातील गवत पेटविताना घडला प्रकार, पलूस तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT