मंगळवारची मंत्रिमंडळ
बैठक ठरली अखेरची
मुंबई, ता. २८ ः मंत्रालयात मंगळवारी (ता. २७) झालेली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी अखेरची ठरली. याच दिवशी त्यांनी महापालिका निवडणुकीत पक्षाची कामगिरी चांगली झाली नाही, परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चांगले यश मिळवण्यासाठी त्यांनी रणनीती ठरविणारी बैठकही घेतली होती. त्यानुसार बुधवारपासून राज्यात प्रचार दौरा सुरू करण्याचे नियोजन केले होते. त्याचाच भाग म्हणून पहिल्याच प्रचारसभेसाठी बारामती येथे पोहोचताना त्यांचे विमान अपघातात निधन झाले. निवडणुकीच्या रणनीतीसोबत त्यांनी दिलेल्या सूचना नेत्यांसाठी आता केवळ आठवणी राहिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, मंत्रालयात झालेल्या त्यांच्या अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी अजेंड्यावर आलेल्या विषयांपैकी पीएम सेतू योजना, ट्रेड्स प्लॅटफार्म, शत्रू मालमत्तेच्या खरेदी-विक्रीवरील मुद्रांक शुल्क माफ करणे, धुळ्यातील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीचे पुनरुज्जीवन करणे, शासकीय जमिनींच्या भाडेपट्टीचा कालावधी वाढविणे इत्यादी विषयांवर आपले अभ्यासपूर्ण मत मांडले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.