मुंबई

आज भाजीपाला, फळे व कांदा-बटाटा मार्केट बंद

CD

जुईनगर (बातमीदार) : उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अपघाती निधनाने राज्यात शोककळा पसरली आहे. मुंबई एपीएमसीमधील मसाला व धान्य मार्केट बुधवारी (ता. २९) बंद ठेवण्यात आले. भाजीपाला, कांदा-बटाटा आणि फळ मार्केट गुरुवारीही (ता. २९) बंद राहणार असल्याची माहिती एपीएमसीचे सचिव शरद जरे यांनी दिली. या निर्णयामुळे उद्या कांदा-बटाटा, भाजीपाला व फळांच्या घाऊक व्यवहारांवर परिणाम होणार असून, बाजारातील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.

आशियातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)मधील बाजार घटकांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर एक दिवसाचा दुखवटा पाळत एपीएमसी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एपीएमसीतील व्यापारी संघटना, आडते व्यापारी तसेच माथाडी कामगार संघटनांनी या निर्णयाला पाठिंबा दर्शवला असून, सर्व संबंधितांनी बाजार बंदसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुखवटा संपल्यानंतर पुढील दिवशी बाजारातील व्यवहार पूर्ववत सुरू करण्यात येतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

----
दुकाने, हॉटेल्स कडकडीत बंद
बेलापूर (बातमीदार) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या बातमीमुळे राज्यातील विविध भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. यानंतर वाशी, जुईनगर, नेरूळ, सीवूड्स परिसरात दुकानदारांनी आपले दुकान बंद ठेवत हळहळ व्यक्त केली.

राज्यात सध्या जिल्हा परिषद निवडणुकांचे वारे वाहत असून, सर्वच पक्षांचे कार्यकर्ते प्रचारात व्यग्र आहेत. मात्र, अजित पवार यांच्या निधनाची बातमी धडकताच, आदर व्यक्त करत सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांचा निवडणूक प्रचार तत्काळ थांबवला. नवी मुंबईतील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आपापल्या परिसरात दुकाने, हॉटेल बंद करण्याची विनंती केली. यानंतर नवी मुंबई परिसरातील बहुतांश दुकाने तत्काळ बंद करण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, बाजारपेठा आणि व्यवहार कडकडीत बंद ठेवण्यात आल्याने संपूर्ण परिसरात शांतता पसरली. दरम्यान, पहाटेपासून कामाला सुरुवात करणारा हा लोकनेता अशा प्रकारे काळाच्या पडद्याआड गेल्याने प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याच्या प्रतिक्रिया विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त करत दुःख व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Conflict : इराणचा युद्धबंदीच्या चर्चांना नकार ! अमेरिकेला ठाम इशारा – गरज असेपर्यंत युद्ध सुरूच राहणार

Islapur Fire Incident: ईस्लापूरमध्ये भीषण आग; हॉटेल, हार्डवेअर व शूज सेंटरचे लाखोंचे नुकसान

आरोग्यमंत्र्यांच्या माहितीचा बुरखा टराटरा फाटला, घाटीमध्ये रेबीजच्या लसीचा तुटवडा; रुग्णांना मोठा भुर्दंड

Nashik Sharda Sanman: शारदानगरमध्ये ‘शारदा सन्मान पत्र’ प्रदान; महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव; कल्याण पाचांगणे

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT