अंबरनाथ, ता. २८ (वार्ताहर) : येथील नवरेनगर परिसरात भररस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी एका व्यावसायिकाच्या गळ्यातील सोन्याचा गोफ जबरीने ओढून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महालक्ष्मीनगर येथील रामकृष्ण अपार्टमेंटमध्ये राहणारे ३५ वर्षीय गणेश दातखिळे हे कॅटरिंग व्यवसाय करतात. मंगळवारी (ता. २७) रात्री साडेदहाच्या सुमारास ते दुचाकीवरून घरी जात होते. नवरेनगर परिसरातील आपल्या सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचताच मागून एका दुचाकीवरून दोन तरुण त्यांच्याजवळ आले. या दोन्ही आरोपींचे वय अंदाजे २५ ते २८ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. दातखिळे यांना काही समजण्याच्या आतच दुचाकीवरील मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोन्याचा गोफ जोरात ओढून काढला आणि क्षणार्धात दोघेही पसार झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा पुढील तपास शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक एम. व्ही. कोल्हे करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.