नवनिर्वाचित नगराध्यक्षांसाठी प्रशिक्षण
मुंबई, ता. २८ : अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेने महाराष्ट्रातील नवनिर्वाचित २८८ नगराध्यक्षांसाठी प्रशिक्षण वर्ग अंधेरी येथील संस्थेच्या कार्यालयात सुरू आहे. उद्या (ता. २९) या प्रशिक्षण वर्गाचा समारोप समारंभ आहे. गेल्या बुधवारी (ता. २१) प्रशिक्षण वर्गाचा प्रारंभ संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण यांनी केला. संस्थेचे महासंचालक डॉ. जयराज फाटक यांनी प्रास्ताविक केले. या प्रशिक्षण वर्गात नगरपालिका कायद्यातील तरतुदी, नगराध्यक्षांचे व नगरसेवकांचे अधिकार व सभा कामकाज नियमांतील तरतुदी याबाबत संस्थेचे मानद संचालक लक्ष्मणराव लटके यांनी मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.