मुंबई

आधुनिकीकरणाच्या नावाखाली महापालिका शाळा खासगी संस्थांना आंदण

CD

महापालिकांच्या शाळा खासगी संस्थांकडे!
आधुनिकीकरणासाठी सहा शाळांसाठी निविदा प्रक्रिया
मुंबई, ता. २८ ः मुंबई महापालिकेच्या शाळेतील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत असताना, गुणवत्तेवर भर देण्याऐवजी महापालिका प्रशासनाने मुंबईतील सहा शाळा खासगी संस्थांना चालविण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रशासनाने ‘शाळांचे आधुनिकीकरण’ या गोंडस नावाखाली खासगी संस्थांना देण्यासाठी अधिकृतपणे निविदाही जारी केली आहे.
खासगी संस्थांना भागीदारी तत्त्वावर दिल्या जाणाऱ्या शाळांमध्ये प्रामुख्याने कन्या शाळा माहीम, बीएमसी शाळा मालाड, धनजेवाडी शाळा, एमएचबी उर्दू शाळा, वाकोला बीएमसी शाळा आणि ठाकूर व्हिलेज येथील शाळांचा समोवश आहे. महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची कमी होत असलेली पटसंख्या रोखण्यासाठी तसेच गळती रोखण्यासाठी या शाळा खासगी संस्थांना देण्याचा प्रकल्प प्रशासनाकडून राबविला जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिकेने जारी केलेल्या निविदेत ज्या शाळांचे हस्तांतरण हे निविदेत यशस्वी ठरणाऱ्या खासगी संस्थांना केले जाईल, त्यांच्याकडे संबंधित शाळांचे डिझाइन, बांधकाम, अर्थपुरवठा, संचालन, देखभाल, आदी जबाबदारी राहील. यातून या पीपीपी मॉडेलद्वारे महापालिकेवरील आर्थिक ताण कमी करून शाळांच्या सुविधा सुधारण्याचा प्रयत्न होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.
-----
विशेष कंपनी स्थापन होणार
निवड झालेल्या खासगी संस्थेला स्वतंत्र विशेष उद्देश कंपनी स्थापन करावी लागेल. महापालिकेचा संचालक मंडळात थेट सहभाग असणार नाही. शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत नोंदणी व नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच अल्पसंख्याक दर्जासाठी अर्ज करता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Odisha Tragedy : ओडिशात मोठी दुर्घटना ! रुग्णालयाला भीषण आग; ICU मधील १० रुग्णांचा गुदमरुन मृत्यू

'फक्त ब्रा घालून किसिंग सीन करायला लावायचे' अभिनेत्रीने केली प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोलखोल, म्हणाली, 'प्रत्येक सीनमध्ये इंटिमेन्सी..'

Dubai Airport Drone Attack : दुबई विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला ! आकाशात धुराचे लोट, विमानसेवा विस्कळीत

Pune News : ‘मसाप’मध्ये दहा वर्षांनी सत्तापालट

SCROLL FOR NEXT