मुंबई

सिडकोचा सहाय्यक वसाहत अधिकारी आणि खाजगी इसम २ लाखांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

CD

दोन लाखांच्या लाचप्रकरणी कारवाई
सिडकोचा सहाय्यक वसाहत अधिकारी; खासगी व्यक्ती ताब्यात
नवी मुंबई, ता. २८ (वार्ताहर) : सिडकोतील घरांच्या हस्तांतरण प्रक्रियेत होणारा भ्रष्टाचार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सानपाडा येथील एका सदनिकेचे सिडको ट्रान्स्फर करून देण्यासाठी दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या सिडकोच्या प्रभारी सहाय्यक वसाहत अधिकाऱ्यासह एका खासगी मध्यस्थाला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी पकडले. या कारवाईमुळे सिडको वर्तुळात खळबळ उडाली आहे. शैलेश आत्माराम घरत (प्रभारी सहाय्यक वसाहत अधिकारी) आणि नागेंद्र तुलसीराम पांडे (खासगी व्यक्ती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणातील तक्रारदार हे खारघर येथील रहिवासी असून, त्यांनी सानपाडा येथील एका सदनिकेचे सिडको ट्रान्स्फर करण्यासाठी ११ जून २०२५ रोजी ऑनलाइन अर्ज केला होता. या कामासाठी विभागीय कार्यालय सिडको येथील प्रभारी सहाय्यक वसाहत अधिकारी शैलेश घरत यांनी तक्रारदाराकडे चार लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने २२ जानेवारीला नवी मुंबई एसीबी कार्यालयात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची खातरजमा करण्यासाठी २७ जानेवारीला पडताळणी करण्यात आली.

सापळ्यात अडकला
या वेळी घरत यांनी खासगी व्यक्ती नागेंद्र पांडे याच्या माध्यमातून तडजोडीअंती दोन लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार, २८ जानेवारीला नेरूळ रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेल येथे सापळा रचण्यात आला होता. दुपारी घरत यांच्या सांगण्यावरून पांडे याने तक्रारदाराकडून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक धर्मराज सोनके, पोलिस निरीक्षक किरणकुमार वाघ आणि पोलिस निरीक्षक अरुंधती येळवे यांच्या एसीबीच्या पथकाने पांडेला पकडले.

घराची झडती
त्यानंतर एसीबीच्या पथकाने नेरूळ येथील सिडको विभागीय कार्यालयातून मुख्य आरोपी शैलेश घरत यालाही ताब्यात घेतले. या कारवाईत पकडण्यात आलेल्या दोन्ही आरोपींविरोधात नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोन्ही आरोपींचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. तसेच प्रभारी सहाय्यक वसाहत अधिकारी शैलेश घरत याच्या नेरूळ येथील राहत्या घराची झडती घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahadev Munde Murder Case: ''महादेव मुंडेंचा खून धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुन'', नार्को टेस्टमध्ये खुलासा झाल्याचा फड यांचा दावा

Mumbai News: लोकलचा प्रवास सह्याद्रीच्या डोंगररांगांतून होणार, पनवेल-कर्जत कॉरिडॉर प्रकल्प अंतिम टप्प्यात; कधी सुरू होणार?

Pune Accident : पुणे-सातारा महामार्गावरील नवीन कात्रज बोगद्याजवळ भीषण अपघात; कंटेनरने ४ गाड्यांना उडवले, ८ जण गंभीर जखमी

Deeya Yadav : १६ वर्षीय दीया यादवचे वन डेत द्विशतक; २२ चौकार अन् ७ षटकारांचा पाऊस, संघाच्या ३५६ धावा अन् २४७ धावांनी विजय

Iran-Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा भारतावर परिणाम! तेलापासून मसाल्यांपर्यंत अनेक वस्तू महाग, जाणून घ्या यादी...

SCROLL FOR NEXT