मुंबई

बेकायदा फलकांमुळे विद्रुपीकरण

CD

बेकायदा फलकांमुळे विद्रुपीकरण
बोईसर परिसरात दुर्लक्षामुळे अपघाताची भीती
बोईसर, ता. २९ (वार्ताहर) : बोईसर तसेच आजूबाजूच्या परिसरात विजेचे खांब, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या जागा, ग्रामपंचायत हद्दीतील ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेकायदा फलकबाजी सुरू आहे. या प्रकारांमुळे शहराचे विद्रुपीकरण सुरू आहे.
राजकीय कार्यक्रम, वाढदिवस, शुभेच्छा, जाहिराती अशा विविध कारणांसाठी रस्त्याच्या कडेला, चौकात, वर्दळीच्या ठिकाणी फलक लावले जातात. अनेक ठिकाणी तुटलेल्या तारांवर वाकलेल्या खांबांवर हे फलक बसवण्यात आले आहेत. जोरदार वाऱ्यामुळे फलक वाहनचालक, पादचारी अथवा स्थानिक नागरिकांच्या अंगावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, लावलेले फलक तसेच ठेवले जातात. कार्यक्रम संपल्यानंतरही संबंधित व्यक्ती किंवा संस्था काढत नसल्याने शहराच्या सौंदर्यावरही त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.
----------------------------------------
कारवाईची मागणी
बेकायदा फलकांवर कठोर पावले उचलली गेली नाहीत, तर हा प्रकार नागरिकांच्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ बेकायदा फलक हटवून दोषींवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Rule: वसुली एजंट्सचे कर्जदाराशी गैरवर्तन सहन केले जाणार नाही; बँका आणि एजंटना इशारा, RBI कडून नवे नियम जारी

IND vs PAK : तो अपयशी होण्याची शक्यता अधिक आहे! पाकिस्तानी खेळाडू अभिषेक शर्माला म्हणाला, slogger...; केला अपमान

Mumbai Pune Expressway traffic update: सुट्टीचा प्लॅन बिघडला! विकेंडच्या सुरुवातीलाच मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

सगळ्यात कमी वयाची नायिका पडतेय सगळ्यांवर भारी; 'कमळी'ची TRPमध्ये मोठी उडी; जुई गडकरीचं स्थान धोक्यात

Thane News: ३०० झाडांची बेकायदा कत्तल! सर्वोच्च न्यायालयाचे नियम धाब्यावर

SCROLL FOR NEXT