मुंबई

विनोबा ॲप उपक्रमांतर्गत शिक्षकांचा भेटवस्तू देऊन शिक्षकांचा सन्मान !

CD

विनोबा ॲप उपक्रमांतर्गत शिक्षकांचा सन्मान
मुरुड, ता. २९ (बातमीदार) ः विनोबा ॲप उपक्रमांतर्गत एफएलएन चाचणी व इतर शैक्षणिक प्रगतीमध्ये अव्वल स्थान प्राप्त करणाऱ्या शाळा आणि शिक्षकांचा सेंट्रल शाळेत भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. गटशिक्षणाधिकारी सुनिल गवळी यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा प्रकल्प अधिकारी वैभव शिर्के यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
एफएलएन चाचणी किंवा ॲपद्वारे घेण्यात येणाऱ्या इतर चाचणीसंदर्भात अधिक परिश्रम घेऊन आणि शाळेत घेत असलेल्या उपक्रमांचे व्हिडिओ /फोटो ॲपमध्ये रूपांतर करण्यासाठी सुनिल गवळी यांनी शिक्षकांना आवाहन केले होते. मुरुड तालुक्यातील चोरढे जिल्हा परिषद शाळा, ताडगाव शाळा, वेताळवा शाळा यांचा सन्मान करण्यात आला. यात शिक्षक संगीता भगत, रूपाली ठाकूर, अनंत माळी यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
हा सन्मान सोहळा यशस्वी करण्यासाठी बोर्ली केंद्रप्रमुख निलेश वारगे, महेश भगत, केंद्र प्रमुख गालिब जनाब, विश्वनाथ म्हात्रे, सुनील काळे, चेतन पाटील यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Crisis: इराण-इस्रायल युद्धाचा महाराष्ट्रात परिणाम! महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय; आता LPG पुरवठ्यावर नजर राहणार

लखनौचा कायापालट! ४५ मिनिटांचा प्रवास आता फक्त १५ मिनिटांत; पाहा योगींचा 'ग्रीन' प्लॅन!

PM Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा आले २ हजार रुपये! PM मोदींनी जारी केला २२ वा हप्ता; यूपीच्या शेतकऱ्यांवर पैशांचा पाऊस!

March Ending: 31 मार्चपूर्वी करा हे काम! नाहीतर PF आणि पेन्शन खाते होऊ शकते निष्क्रिय; करसवलतीचा लाभही मिळणार नाही

Ayodhya Ram Mandir : काय आहे राम मंदिरात बसवले जाणारे 'श्री राम यंत्र'? राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार भव्य सोहळा!

SCROLL FOR NEXT