मुंबई

चित्रपट निर्मितीच्या नावाखाली व्यवसायिकाला लाखोंना गंडा

CD

चित्रपट निर्मितीच्या नावाखाली १९ लाखांचा गंडा
पती-पत्नी जेरबंद
कल्याण ता. २९ (बातमीदार) : व्यावसायिक मित्राचा विश्वास संपादन करून चित्रपट निर्मितीच्या नावाखाली १९ लाख ३३ हजार रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार कल्याण पूर्वेमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी पती-पत्नीला अटक केली आहे.

कल्याण पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी परिसरात मनोज गोरडे (४४) यांचा मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय आहे. त्यांच्या दुकानाच्या शेजारीच किरण शेटे (४१) हा संगणक दुरुस्तीचे काम करायचा. या ओळखीचा फायदा घेत किरणने चित्रपट निर्मितीसाठी पैशांची गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष गोरडे यांना दाखवले. गोरडे यांनी सुरुवातीला नकार दिला होता; मात्र किरणची पत्नी राधिका हिने ‘‘मी स्वतः चित्रपटात मुख्य भूमिका करत आहे, तुम्हाला नक्कीच नफा होईल’’ असे सांगून त्यांचा विश्वास जिंकला. शेटे पती-पत्नीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून गोरडे यांनी कर्ज काढून आणि सोने गहाण ठेवून मार्च २०२१ ते डिसेंबर २०२२ या काळात तब्बल ३२ टप्प्यांत १९ लाख ३३ हजार रुपये दिले. गोरडे यांनी वारंवार मागणी करूनही आरोपींनी अधिकृत करारपत्र करण्यास टाळाटाळ केली.

धमकावले आणि पैसे नाकारले
गुंतवणुकीवर परतावा मिळत नसल्याचे पाहून गोरडे यांनी आपले मूळ पैसे परत मागितले. त्या वेळी आरोपींनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला, तसेच पुन्हा पैसे मागितले तर जीवे मारू, अशी धमकी देत शिवीगाळ केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गोरडे यांनी पोलिस ठाणे गाठले. कोळसेवाडी पोलिसांनी किरण शेटे आणि राधिका शेटे यांच्या विरोधात फसवणूक व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजाराची हिरव्या रंगात सुरुवात! MCX आणि NSEचा सोनं-चांदीबाबत मोठा निर्णय; कोणते शेअर्स वाढले?

Rajya Sabha election: महाराष्ट्रातून बदलणार दिल्लीचं राजकारण? राज्यसभेच्या ३७ जागांत एनडीएला मोठा फायदा, ७ जागांचं महत्त्व काय?

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत आदिवासी विद्यार्थ्यांनी शिवजयंती मधून शिवबांचे बालपण रेखाटलं

Mumbai Pune Expressway traffic jam : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी; खंडाळा बोगद्याजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा

Sugar Factory : कारखाने वर्षभर सुरू ठेवण्यासाठी हालचाली, मल्टिफीडसाठी ६३ कारखान्यांचा पुढाकार

SCROLL FOR NEXT