हॉटेल कॅशियरचा २.४० लाखांवर डल्ला
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : राजीव गांधी नगर येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कॅशियरने रोख रक्कम व बँक चेकद्वारे मोठा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात झारखंड येथील बबलू कुमार यादव (२५) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदुस्तान हॉटेल मॅनेजर प्रशांत शेठ यांनी तक्रार दाखल केली आहे.
हिंदुस्तान हॉटेलमध्ये निखिल निंबाळकर व रोहित पंडित असे कॅशियर म्हणून कार्यरत असून आळीपाळीने सुट्टीवर जाणार असल्याने मागील दोन महिन्यांपासून बबलू कुमार यादव याला तात्पुरत्या स्वरूपात कॅशियर म्हणून नेमले होते. २ जानेवारीपासून बबलू यादव याला कॅशियर म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. तर, १७ जानेवारी रोजी बबलू यादव कोणालाही काही न सांगता कामावरून निघून गेला व पुन्हा परत आला नाही. त्यानंतर १६ जानेवारी ते १९ जानेवारी या कालावधीत हॉटेलच्या कॅश काउंटरमधील ४० हजार रोख आणि हॉटेलच्या भारत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमधील खात्याचा चेक वापरून दोन लाख रुपये अशी एकूण दोन लाख ४० हजार रुपयांची रक्कम चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी बबलू कुमार यादव याच्याविरोधात वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.