मुंबई

पीडित मुलीला सात वर्षांनंतर न्याय

CD

भिवंडी, ता. २९ (वार्ताहर) : शहरातील नारपोली पोलिस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी भिवंडी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला २० वर्षांचा सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे.
अब्दुल कलाम ऊर्फ सद्दाम पीर मोहम्मद अन्सारी (वय ३६) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अन्सारीने २०१९मध्ये एका अल्पवयीन मुलीवर शारीरिक अत्याचार केला होता. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर भिवंडी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात विशेष खटला केला. या खटल्याची सुनावणी न्यायाधीश एन. के. कारंडे यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षातर्फे ॲड. सी. बी. नवले व ॲड. व्ही. एम. मुंडे यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. तपासाची जबाबदारी नारपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय कादबाने व निरीक्षक ज्ञानेश्वर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपासात पोलिस उपनिरीक्षक एम. बी. कतूर, कोर्ट पैरवी अधिकारी हवालदार शर्मा, सांबरे, पाटील तसेच महिला पोलिस शिपाई सगाठीया यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. न्यायालयाने सादर केलेले पुरावे ग्राह्य धरत अन्सारीला दोषी ठरवून शिक्षा सुनावली.

१५ दिवसांत दोन निर्णय
मागील १५ दिवसांत भिवंडी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाकडून शहरातील दोन पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये आरोपींना दोषी ठरवून कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे. या निर्णयानंतर अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांना आळा बसेल आणि समाजात कायद्याची जरब निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi: हम पहला ही उड़ा देंगे… राहुल द्रविडशी पहिल्याच भेटीत काय म्हणालेला वैभव? सॅमसनने केली पोलखोल; Video

Gold Silver Rate: सोनं १६०० रुपये तर चांदी ४ हजार रुपयांनी स्वस्त, भावात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे दर

Kolhapur Adamapur Yatra : बाळूमामांच्या यात्रेत विषबाधा; रथोत्सवावेळी वाटप केलेल्या लस्सीमुळे शंभरांवर भाविकांना विषबाधा

Gautam Gambhir: सहा षटकांत सामना जिंकवण्याची क्षमता; प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याकडून संजू सॅमसनचे कौतुक

Hapus Mango : गुढीपाडव्याला आंबा होणार महाग! यंदा हापूस उत्पादनात तब्बल ७० टक्क्यांनी घट

SCROLL FOR NEXT