कर्जत येथील आश्रमशाळेत ‘रायला’ उपक्रम
विद्यार्थ्यांना नेतृत्व, सुरक्षितता व सामाजिक जाणिवेचे धडे
ठाणे, ता. २९ (बातमीदार) : समाजातील वंचित व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ ठाणे टायटन्स यांच्या वतीने कर्जत येथील शासकीय आश्रमशाळेत दोनदिवसीय ‘रोटरी युथ लीडरशिप अवॉर्ड्स - रायला'' उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास, सामाजिक जबाबदारी आणि सुरक्षिततेविषयी जागृती निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.
डोंगरपाडा-पात्रज येथील शासकीय आश्रमशाळेत दोनदिवसीय उपक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ ठाणे टायटन्स, रोटरॅक्ट क्लब ऑफ ठाणे टायटन्स आणि इनर व्हील क्लब ऑफ उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. या शाळेच्या वसतिगृहात ७ ते १५ वर्षे वयोगटातील १०० मुली व २० मुले वास्तव्यास असून, त्यांना शिक्षणासोबत सुरक्षित व संरक्षित निवासी सुविधा उपलब्ध करून दिली जाते.
या उपक्रमात रोटरी क्लबचे अध्यक्ष योगेश नंदकुमार फुटाणे यांच्या नेतृत्वाखाली रोटरी पथक सक्रिय सहभागी झाले. क्लब मेंटॉर डॉ. विजय केवलरामाणि, माजी अध्यक्ष नंदकुमार फुटाणे व संदीप धोत्रे, क्लब सदस्य ॲड. सौरभ केवलरामाणि यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष निलेश नाईडू यांच्यासह सदस्य देव व साक्षी यांनीही उपक्रमात सहभाग घेतला. इनर व्हील क्लब ऑफ उल्हासनगरच्या अध्यक्षा डॉ. गायत्री केवलरामाणि यांचीही उपस्थिती लाभली.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक अजित भनसोडे, शिक्षकवर्ग आणि वॉर्डन सविता पखाले व वॉर्डन राजेंद्र माने उपस्थित होते. मुख्याध्यापकांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व सामाजिक जाणीव वाढते, असे नमूद केले. भविष्यातही अशा उपक्रमांचे सातत्य राखावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रभावी एकपात्री नाट्यप्रयोग सादर
दोन दिवसांत विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष संवाद, सामूहिक भोजन, खेळ, मनोरंजनात्मक उपक्रम, चॉकलेट वाटप आणि शाळेला आवश्यक औषधांचा संच सुपूर्द करण्यात आला. रंगकर्मी व थिएटर आर्टिस्ट आरती मोरे यांनी विशेष सत्र सादर करत बालविवाहाचे दुष्परिणाम, बाल लैंगिक शोषण व छेडछाडीविषयी जागृती करणारे प्रभावी एकपात्री नाट्यप्रयोग सादर केले. यामधून ‘स्वतःची सुरक्षितता आणि अन्यायाविरोधात बोलणे महत्त्वाचे आहे’ हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.