मुंबई

वाहनांच्या काचा फोडून महागड्या वस्तू लंपास

CD

वाहनांच्या काचा फोडणारा चोरटा गजाआड
कोळसेवाडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई
कल्याण, ता. २९ (बातमीदार) : कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात उभ्या असलेल्या पाच गाड्यांच्या काचा फोडून महागडे साहित्य चोरणाऱ्या सराईत चोरट्याला कोळसेवाडी पोलिसांनी अवघ्या सहा तासांत बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेला लॅपटॉप जप्त केला असून, या तत्पर कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

चक्कीनाकाजवळील रिजेन्सी पार्क येथे मंगळवारी सायंकाळी साडेसात ते बुधवारी सकाळी आठच्या दरम्यान काही वाहने उभी होती. अज्ञात चोरट्याने यातील एका चारचाकी गाडीची काच फोडून १८ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरला. चोरीच्या उद्देशाने त्याने परिसरातील अन्य पाच गाड्यांच्याही काचा फोडून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. फिर्यादीच्या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप भालेराव आणि त्यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीची ओळख पटवली.

आरोपी जेरबंद
गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या सहा तासांच्या आत पोलिसांनी सुजल वाघचौरे (वय २१) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीचा लॅपटॉप हस्तगत करण्यात आला. भरवस्तीत अशा प्रकारे वाहनांच्या काचा फोडल्या गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते; मात्र पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केल्याने रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FASTag Annual Pass वार्षिक टोल पास झाला महाग, १ एप्रिलपासून नवे दर लागू

Nashik LPG Supply : नाशिककरानो घाबरू नका! जिल्ह्यात पुरेसा गॅस साठा; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Nutritionist Health Tips: तुम्हाला 35 वर्षानंतरही राहायचंय फिट आणि निरोगी? न्यूट्रिशनिस्टच्या ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

Nashik Darna Dam : पाणीचोरांवर जिल्हाधिकाऱ्यांचा 'सर्जिकल स्ट्राईक'; आवर्तनासाठी २२ तास वीजपुरवठा राहणार बंद!

SCROLL FOR NEXT