पेण शहरात भटक्या श्वानांची दहशत; मनसे आक्रमक
पेण, ता. २९ (वार्ताहर) : गेल्या काही महिन्यांपासून पेण शहरात भटक्या श्वानांनी दहशत वाढली असून, अनेकांना चावा घेतला आहे. अशा श्वानांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी केली आहे.
मागील दोन महिन्यांपासून शहरासह तालुक्यात भटक्या श्वानांनी केलेल्या हल्ल्यामुळे दररोज ७० ते ८० जण पेण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येतात. मात्र, येथे अँटी रेबीज इंजेक्शन उपलब्ध नसल्याने अनेकांना अलिबाग रुग्णालयात गाठावे लागते. त्यामुळे रुग्णांसह नातेवाइकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून, अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय येथे अँटी रेबीज इंजेक्शन तत्काळ उपलब्ध व्हावे, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली असता त्याचा योग्य साठा उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध झाला आहे. तरी पेण नगरपालिका आणि पंचायत समिती येथील प्रशासनाने ताबडतोब अशा भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील आणि पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांच्याकडे केली आहे. प्रशासनाने अशा भटक्या श्वानांचा बंदोबस्त करून नागरिकांना मोकळा श्वास घेऊन द्यावा अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. या वेळी उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्यासमवेत पेण तालुकाध्यक्षा गौरी वोरा, उपतालुका अध्यक्ष प्रसाद पाटील, नितेश पाटील, विजय पाटील, रुपेश म्हात्रे, कल्पेश पाटील, नयन रोडेकर, कल्पेश सकपाळ आदींसह मनसे सैनिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.