पिंकी मालीचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कळव्यात
कळवा, ता. २९ (बातमीदार) ः बारामती विमान दुर्घटनेतील फ्लाइट अटेंडन पिंकी शिवकुमार माली यांचे पार्थिव गुरुवारी (ता. २९) अंत्यदर्शनासाठी त्यांच्या सासरी कळव्यातील रेतीबंदरमधील घरी आणण्यात आले होते. सासरच्या कुटुंबीयांनी व इमारतीतील रहिवाशांनी तिच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. पिंकीचे पार्थिव या ठिकाणी २० मिनिटे ठेवण्यात आले होते. पिंकी माली व तिच्या पतीने मेहता रिव्हेरामध्ये फ्लॅट घेतला होता. ती येथे राहायला येणार होती. तिच्या मृत्यूची बातमी मिळाल्यावर तिचे पती व सासरच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. तिचे पार्थिव मुंबईला नेण्याआधी सासरच्या घरी अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.