थकबाकीदारांविरुद्ध पालिका आक्रमक
मुंबई, ता. २९ : मोठ्या थकबाकीदारांविरुद्ध आता धडक कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. वारंवार नोटिसा देऊनही थकबाकीदार मालमत्ता कर भरण्यात टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे पालिकेच्या २४ विभागांना कारवाईचे आदेश दिल्याचे समजते.
मालमत्ता कराची ६३ कोटींहून अधिक रक्कम थकवणाऱ्या सात मालमत्तांना पालिकेकडून लिलावापूर्वी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र कर न भरल्याने पालिकेच्या कर निर्धारण व वसुली विभागाने कारवाईची प्रक्रिया सुरू ठेवली आहे. मालमत्ता कर हाच पालिकेचा प्रमुख महसूल स्रोत आहे. हजारो कोटींची थकबाकी अद्याप वसूल व्हायची आहे. मुंबई महापालिकेची मोठे सात थकबाकीदार असून, त्यांच्याकडे एकूण थकबाकी ६३ कोटी आठ लाख १२ हजार रुपये आहे. त्यांच्याकडे दंडापोटी ३२ कोटी रुपये आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी आता पालिकेने कठोर पावले उचलली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.