अंबरनाथ, ता. २९ (वार्ताहर) : पूर्व वैमनस्यातून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट हिंसक हाणामारीत झाल्याची गंभीर घटना अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर परिसरात घडली आहे. या घटनेत ६० वर्षीय व्यक्ती आणि त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले असून, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथ पूर्व येथील शिवाजीनगर परिसरातील हनुमान मंदिराशेजारी राहणारे रमेश राघवानी (वय ६०) हे बुधवारी (ता. २८) रात्री १० च्या सुमारास घरी होते. यावेळी शेजारी राहणाऱ्या मिलिंद पार्टे याने राघवानी यांच्या पत्नी व मुलीला उद्देशून, तुम्ही आमच्या घराकडे का आलात? असा जाब विचारत मोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. आरोपीने महिलांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. शिवीगाळ पाहून रमेश राघवानी यांनी घराबाहेर येत पार्टेला जाब विचारला. याच रागातून पार्टेने त्यांच्यावर हल्ला चढवला. मारहाण करत त्यांनी घटनास्थळी पडलेल्या विटेने राघवानी यांच्या डोक्यावर प्रहार केला, ज्यात ते गंभीर जखमी झाले. वडिलांना वाचवण्यासाठी धावून आलेल्या त्यांच्या मुलालाही त्याने विटेने मारहाण करून जखमी केले. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. रमेश राघवानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी पार्टेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा प्राथमिक तपास पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग गुंड करत आहे. आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.