मुंबई

निवडणूक रणांगणात रक्तरंजित थरार; नेरळमध्ये चाकू हल्ल्याने राजकीय वातावरण तापले

CD

निवडणूक रणांगणात रक्तरंजित थरार
नेरळमध्ये तरुणावर चाकू हल्ल्याने राजकीय वातावरण तापले

कर्जत, ता. २९ (बातमीदार) ः जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच कर्जत तालुक्यातील नेरळ जिल्हा परिषद गटात निवडणूक रिंगणाला रक्तरंजित वळण मिळाल्याची गंभीर घटना घडली आहे. ममदापूर नाक्यावर एका तरुणावर झालेल्या चाकू हल्ल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नेरळ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

नेरळ जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना (शिंदे गट) उमेदवार सुनीता सुरेश टोकरे उमेदवार आहेत. रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे हे ममदापूर नाक्यावर २८ तारखेला मध्यरात्री कार्यकर्त्यांसह उपस्थित असताना गावातील धनेश्वर शिंगे यांच्याशी त्यांची बाचाबाची झाली. यानंतर विशाल हिसाळके तेथून निघून गेले. काही वेळाने धनेश शिंगे हे झालेला प्रकार विशाल हिसाळगे यांना सांगत असताना, ‘बरोबर आहे’ असे बोलल्याच्या कारणावरून मिलिंद शिंगे याने विशाल यांना जाब विचारत धक्काबुक्की सुरू केली. त्यानंतर रेशब कुरेशी व अरमान पटेल यांनीही मारहाण केली.

पोटात गंभीर जखम
मिलिंद शिंगे याने दुचाकीमधून चाकू काढून विशाल हिसाळके यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. धनेश शिंगे यांनी चाकूहल्ला रोखण्याचा प्रयत्न केला. अखेर तिघांनी मिळून विशाल हिसाळके यांच्यावर चाकूहल्ला केला. या हल्ल्यात विशाल हिसाळके यांच्या पोटात गंभीर जखम झाली आहे. त्यांना मध्यरात्री रायगड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. विशाल हिसाळके यांचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास चालू आहे. दरम्यान, हल्ला करणारे आरोपी हे सुरेश टोकरे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप जखमीचे भाऊ विपुल हिसाळके यांनी केला आहे.

पोलिस बंदोबस्तात वाढ
याप्रकरणी नेरळ पोलिसांनी तातडीने कारवाई करीत दोघांना अटक केली आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. तर सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Crisis: इराण-इस्रायल युद्धाचा महाराष्ट्रात परिणाम! महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय; आता LPG पुरवठ्यावर नजर राहणार

लखनौचा कायापालट! ४५ मिनिटांचा प्रवास आता फक्त १५ मिनिटांत; पाहा योगींचा 'ग्रीन' प्लॅन!

PM Kisan : शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा आले २ हजार रुपये! PM मोदींनी जारी केला २२ वा हप्ता; यूपीच्या शेतकऱ्यांवर पैशांचा पाऊस!

March Ending: 31 मार्चपूर्वी करा हे काम! नाहीतर PF आणि पेन्शन खाते होऊ शकते निष्क्रिय; करसवलतीचा लाभही मिळणार नाही

Ayodhya Ram Mandir : काय आहे राम मंदिरात बसवले जाणारे 'श्री राम यंत्र'? राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार भव्य सोहळा!

SCROLL FOR NEXT