मुंबई

बदलापुरात लोखंडी बाकड्यांचा घोटाळा

CD

बदलापूर, ता. २९ (बातमीदार) : कुळगाव-बदलापूर नगर परिषद हद्दीत गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत कोट्यवधी रुपयांचे लोखंडी बाकडे बसवण्यात आले आहेत. यासाठी सुमारे २० कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विविध प्रभाग, गृहनिर्माण सोसायट्या; तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना बसण्याची सुविधा म्हणून हे बाकडे बसवण्यात आले होते. मात्र, देखभालीअभावी अनेक बाकड्यांना गंज लागून त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यातील मोठ्या प्रमाणात बाकडे सध्या गायब झाल्याचा दावा भाजपचे पदाधिकारी हर्षद भोपी यांनी केला आहे.
नगर परिषद क्षेत्रात प्रत्यक्ष पाहणी केल्यास अनेक ठिकाणी पूर्वी बसवलेले लोखंडी बाकडे दिसत नसल्याचे स्पष्ट होते. काही बाकडे चोरीला गेल्याचेही भोपी यांनी म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणासंदर्भात नगर परिषद प्रशासनाकडे त्यांनी निवेदन दिले आहे. वजनाने हलके असल्याने हे बाकडे सहज हलवता येतात आणि त्यामुळेच चोरीचे प्रमाण वाढले असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. या कथित गैरव्यवहाराची गंभीर दखल घेत संपूर्ण प्रकरणाचे प्रत्यक्ष लेखापरीक्षण करून प्रत्येक बाकड्याचा ठावठिकाणा लावावा, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे. सार्वजनिक निधीतून खरेदी केलेली मालमत्ता नेमकी कुठे आहे, तिची सद्यस्थिती काय आहे, याची स्पष्ट माहिती प्रशासनाकडे असणे आवश्यक आहे. अन्यथा हा प्रकार थेट आर्थिक गैरव्यवहाराच्या श्रेणीत मोडतो, असेही निवेदनात नमूद केले आहे.

सिमेंट बाकड्यांची मागणी
भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी लोखंडी बाकड्यांऐवजी सिमेंट काँक्रीटचे बाकडे बसवावेत, अशी सूचनाही भोपी यांनी मांडली. सिमेंटचे बाकडे वजनाने जड असल्याने त्यांची चोरी होणार नाही; तसेच सर्व ऋतूंमध्ये ते अधिक टिकाऊ ठरतील, असे त्यांनी सांगितले. यासोबतच प्रत्येक बाकड्यावर स्वतंत्र अनुक्रमांक टाकून त्यांची नोंद नगर परिषदेच्या मालमत्ता विभागात करण्यात यावी. यामुळे बाकड्यांची अचूक संख्या, स्थान व सद्यस्थितीचा नियमित आढावा घेणे सोपे होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: इराणने युद्धाचे नियमच बदलले! F-25, F-22 जेट्स अन् शक्तिशाली मिसाईल्सला तोंड देणारं तंत्रज्ञान पहिल्यांदाच जगासमोर

Gas Cylinder Shortage : गॅस सिलिंडर टंचाईचा परिणाम; इंडक्शन शेगड्यांची दुपटी किमतीने विक्री, कोळसा व डिझेल शेगड्यांनाही वाढती मागणी

Pune Fire : शनिवारवाड्याजवळ पालापाचोळ्याला आग; नारायण दरवाजाला आगीची झळ

Pune News : पथारी शुल्कात ७५ टक्के कपात करा; स्थायी समितीपुढे ठराव

Gas Cylinder Shortage : कात्रज-भारती विद्यापीठ परिसरात गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा

SCROLL FOR NEXT