मुंबई

प्रेयसीला त्रास देणाऱ्या फुलविक्रेत्याची चाकू भोसकून हत्या

CD

ठाण्यातील हत्येप्रकरणी तिघांना अटक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : प्रेयसीला त्रास देत असलेल्या फुलविक्रेता महेश नारखा याची चाकूने भोसकून हत्या करणाऱ्या मूळ गुजरात येथील काली ऊर्फ रघू जयंतीभाई चौहान (वय २७) आणि शायर विनूभाई मंगरोलिया (२१) यांना नायगाव येथून अटक केली. ठाणे शहर पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या घटनेत सहभागी असलेल्या गीता माळी हिला ठाणेनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्या तिघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्याच्या चेंदनी कोळीवाडा येथे राहणारे महेश नाखवा यांची २८ जानेवारीला अनोळखी व्यक्तींनी चाकूने भोसकून हत्या केली होती. याप्रकरणी ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास ठाणेनगर पोलिस व मालमत्ता गुन्हे कक्षाचे पथक करीत होते. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे दोन मारेकऱ्यांना नायगाव पूर्व येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून पळून जाताना अटक केली. याशिवाय या घटनेत सहभागी असलेल्या गीता माळी हिलाही अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास ठाणेनगर पोलिस करीत आहेत.
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ Final: टीम इंडियावर ४ मोठे ‘शाप’; न्यूझीलंडविरुद्ध इतिहास बदलून भारत ट्रॉफी जिंकणार का?

Gurmeet Ram Rahim Acquitted : गुरमीत राम रहीमची निर्दोष सुटका! सीबीआय कोर्टाचा निकाल हायकोर्टाने का फिरवला? पीडित कुटुंबाचं आता काय होणार?

ज्जे बात ! नोकरांना माज दाखवणाऱ्या अंशुमनला स्वानंदीने चाबकाने फोडलं ; प्रोमो पाहून प्रेक्षकांना आनंद अनावर

UPSC Success Marathi : अभ्यासातील सातत्य, नियोजन आणि मार्गदर्शनामुळे कोल्हापुरातील कुरुंदवाडच्या ऋषिकेशने UPSC मध्ये ६१ वी रँक

Latest Marathi News Live Update : खांडबारा रेल्वे स्थानकावर एका मातेफिरू तरुणाचा धिंगाणा...

SCROLL FOR NEXT