मुंबई

अंधेरी पश्चिमेतील फेरीवाल्यांवर कारवाई

CD

अंधेरी पश्चिमेतील फेरीवाल्यांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० ः अंधेरी (पश्चिम) येथील राम गणेश गडकरी मार्ग (इर्ला मार्ग) परिसरातील सुमारे २०० अनधिकृत फेरीवाले, पदपथांवरील अनधिकृत वाढीव बांधकामांवर पालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागाकडून कारवाई करण्यात आली.
पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निर्देशांनुसार, उपआयुक्त भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनात, सहाय्यक आयुक्त (के पश्चिम विभाग) चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वात गुरुवारी (ता. २९) ही कारवाई करण्यात आली. अंधेरी (पश्चिम) भागातील स्वामी विवेकानंद मार्ग आणि गुलमोहर मार्गाला जोडून असलेल्या तसेच कूपर रुग्णालयाच्या प्रवेश मार्गाशी संलग्न असलेल्या राम गणेश गडकरी मार्गावरील पदपथांवर अनधिकृत वाढीव बांधकामे आढळून आली होती. तसेच या परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांनीही दुकाने उभी केल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे कूपर रुग्णालयात आणीबाणीप्रसंगी रुग्णांना घेऊन येणाऱ्या रुग्णवाहिकांना मार्गक्रमण करण्यास तसेच पादचाऱ्यांना पदपथांवरून चालण्यास अडथळा निर्माण होत होता. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागाकडून निष्कासनाची मोहीम हाती घेण्यात आली. याअंतर्गत या परिसरातील सुमारे २०० अनधिकृत फेरीवाले तसेच पदपथांवरील अनधिकृत वाढीव बांधकामांचे निष्कासन करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कागदपत्रे द्या किंवा जागा खाली करा...; एसआरएने धारावी पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना अंतिम नोटीस बजावली, किती दिवसांची?

MHADA: म्हाडाचे घर घेण्याची संधी! लॉटरीमध्ये ८,००० घरांचा समावेश, पण कुठे? जाणून घ्या ठिकाण आणि प्रकिया...

Indore EV Fire Accident: इंदौरसारखी दुर्घटना टाळायचीये? मग इलेक्ट्रिक कार चार्ज करताना अजिबात करू नका 'या' 5 चुका

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गारांचा पाऊस

Stray Dogs Attack : मोकाट कुत्र्यांचा कहर; सात वर्षांच्या चिमुरडीवर हल्ला!

SCROLL FOR NEXT