मुंबई

टाटा पॉवरने उभारले हरित ऊर्जा प्रकल्प

CD

टाटा पॉवरने उभारले हरित ऊर्जा प्रकल्प
१० हजार मेगावॉटची क्षमता

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : टाटा पॉवरची उपकंपनी असलेल्या टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडने (टीपीआरईएल) देशभरात तब्बल १० हजार मेगावॉट क्षमतेचे हरित ऊर्जा प्रकल्प उभारून त्यामधून वीजनिर्मिती सुरू केली आहे. त्यामध्ये सुमारे नऊ हजार ७०० मेगावॉट क्षमतेचे सौर प्रकल्प असून, २९० मेगावॉटचे पवन ऊर्जा प्रकल्प आहेत. त्यामुळे देशात हरित ऊर्जा पुरेशी उपलब्ध होऊ लागली आहे.
टाटा पॉवरने आर्थिक वर्ष २०२५-२६च्या पहिल्या नऊ महिन्यांत एक हजार ८८० मेगावॉटचे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. हा आकडा मागील वर्षीच्या याच कालावधीत कार्यान्वित करण्यात आलेल्या १,४०० गिगावॉट क्षमतेच्या तुलनेत ३३ टक्के अधिक आहे. प्रकल्पाचे नियोजन, उभारणी आणि वीजनिर्मिती (ईपीसी) या तीन टप्प्यांवर ही उभारणी केली आहे. दरम्यान, या तिमाहीत कार्यान्वित करण्यात आलेल्या प्रमुख प्रकल्पांमध्ये राजस्थान, तमिळनाडूतील प्रकल्पांचा समावेश आहे. प्रगत अभियांत्रिकी पद्धतीचा अवलंब करीत टीपीआरईएलने आव्हानात्मक परिस्थितीतही सातत्याने प्रकल्प पूर्ण केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सामान्यांना दिलासा! पेट्रोल पंपावरून मिळणार रॉकेल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन योजना आणि किंमत...

BCCI जसप्रीत बुमराहला २ कोटींची नुकसान भरपाई देणार; त्यांच्या एका निर्णयाने झालाय घोळ, करायला गेले एक अन् घडलं भलतंच...

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत बाजारपेठा गजबजल्या; रेडीमेड गुढींना वाढती मागणी

Yeola Traffic Rule : येवलेकरांना मोठा दिलासा! २४ मार्चपासून मनमाड-मालेगाव मार्गावर दिवसा अवजड वाहतुकीला बंदी

राहुल मोदीशी लग्न करणार श्रद्धा कपूर? मावशी तेजस्विनी कोल्हापुरेने दिली पहिली प्रतिक्रिया, हसल्या आणि म्हणाल्या-

SCROLL FOR NEXT