चिमुकलीच्या अपहरणप्रकरणी दाम्पत्य अटकेत
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : मुंब्रा येथून तीन महिन्यांच्या चिमुकलीच्या झालेल्या अपहरणप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी अकोला जिल्ह्यातील खेटरी गावातून मोहम्मद मुजीब गुलाब (वय ३१) आणि खैरुन्निसा (३०) या दाम्पत्याला अटक केली आहे. पोलिसांनी हा गुन्हा सहा दिवसांत उघडकीस आणला आहे.
चिमुकलीचे अपहरण केल्यानंतर अटकेतील महिलेने आपल्या बहिणीला मुंब्रा रेल्वे स्थानकात बोलवून सरप्राईज दिले. मात्र ते सरप्राईज त्या दाम्पत्याला अखेर जेलपर्यंत घेऊन गेले. त्या चिमुकलीची मुंब्रा पोलिसांनी एक हजार ६०० सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तपासून सुखरूप सुटका केली. तसेच त्या दाम्पत्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेतील त्या दाम्पत्याला लग्नानंतर आठ ते नऊ वर्षे मूलबाळ होत नसल्याने त्यांनी हे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासात समोर आल्याची माहिती ठाणे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी शुक्रवारी झालेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. ठाणे शहर पोलिस आयुक्तांनी त्या चिमुकलीला तिच्या आईच्या स्वाधीन केले. मुंब्रा, खाडी मशीनकडे जाणाऱ्या रस्त्यावर २३ वर्षीय महिला तिच्या दोन मुलींना कडेवर घेऊन २२ जानेवारीला रस्ता ओलांडत होती. अटकेतील महिला त्या महिलेच्या जवळ आली आणि तिने तीन महिन्यांच्या मुलीला माझ्याकडे द्या. मीही समोरच जात आहे, असे तिने सांगितले. त्या वेळी तक्रारदार महिलेने मुलीला तिच्याकडे विश्वासाने दिल्यावर त्या मुलीला घेऊन ती महिला पळून गेली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.