मुंबई

सायन उड्डाणपूलाचे काम १५ जुलै पूर्वी पूर्ण होणार

CD

सायन उड्डाणपुलाचे काम १५ जुलैपूर्वी पूर्ण होणार
पालिका प्रशासनाची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० : शीव (सायन) उड्डाणपुलाचे काम वेगात सुरू असून, १५ जुलैपर्यंत सर्व कामे पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी ग्वाही पालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर यांनी दिली.
शीव पूर्व-पश्चिम भागांना जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणी प्रकल्‍प स्‍थळाची अभिजित बांगर यांनी काल (ता. २९) पाहणी केली. त्या वेळी बांगर यांनी हे निर्देश दिले. या पाहणी दौऱ्यात प्रकल्प कामाची सद्य:स्थिती, उर्वरित कामाचे टप्पे आणि त्यांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली. पादचाऱ्यांना पूर्व-पश्चिम येण्या-जाण्यासाठी पादचारी पूल कार्यान्वित करण्‍यात आला आहे. दोन भुयारी पादचारी मार्गांपैका एक भुयारी पादचारी मार्ग पूर्ण झाला आहे. येत्‍या पंधरवड्यात तो कार्यान्वित करण्‍यात येईल. याच पद्धतीने महापालिका आणि रेल्‍वे प्रशासनामार्फत केली जाणारी कामे अधिकाधिक समांतर पद्धतीने करावीत, प्रकल्‍पाच्‍या कालमर्यादेचे पालन करावे, असे निर्देश बांगर यांनी दिले आहेत. शीव पुलाचे रेल्वे हद्दीतील काम रेल्वे विभाग आणि पोहोच मार्ग, दोन पादचारी भुयारी मार्ग इत्यादींचे काम पालिका करीत आहे. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. हा भुयारी पादचारी मार्ग कार्यान्वित झाल्‍यानंतर रेल्‍वे पुलाच्‍या पश्चिमेकडील पादचारी वाहतुकीची फेरआखणी करावी. पश्चिमेकडील अधिकाधिक भाग कामासाठी उपलब्‍ध व्‍हावा, असे नियोजन करावे. पश्चिमेकडील कामाचे चार टप्‍पे असून, या चारही टप्‍प्‍यांच्‍या पूर्णत्‍वाचे सूक्ष्‍म नियोजन करण्‍यात आले असल्याची माहिती बांगर यांनी दिली.
...
समन्वय साधा!
पालिका प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाने परस्पर समन्वय साधून प्रामाणिकपणे काम करावे, असे सांगत नागरिकांची असुविधा लवकरात लवकर दूर होईल, असेदेखील बांगर यांनी या वेळी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT