मुंबई

समाजवादीचे सहा नगरसेवक नॉट रिचेबल

CD

समाजवादीचे सहा नगरसेवक ‘नॉट रिचेबल’
‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’च्या सत्तास्थापनेचा पेच कायम; राजकीय चर्चांना उधाण

भिवंडी, ता. ३१ (वार्ताहर) : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाचा मुहूर्त अद्याप जाहीर झालेला नसला, तरी त्यापूर्वीच शहरात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ''भिवंडी सेक्युलर फ्रंट''ने सत्तास्थापनेचा दावा करण्यापूर्वीच समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवक ''नॉट रिचेबल'' झाले आहेत. यामुळे आघाडीच्या बहुमताचा डाव फसण्याची चिन्हे दिसत आहेत.

काँग्रेस (३०), राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (१२) आणि समाजवादी पक्ष (६) यांनी एकत्र येत भिवंडी सेक्युलर फ्रंटची स्थापना केली होती. एकूण ४८ सदस्यांचे संख्याबळ गाठून काँग्रेसने महापौरपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. खबरदारी म्हणून अनेक नगरसेवकांना अज्ञातस्थळी हलवण्यात आले होते; मात्र ऐनवेळी समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांनी संपर्क तोडल्याने या फ्रंटच्या नियोजनाला मोठा सुरुंग लागला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, समाजवादी पक्षाचे हे सहाही नगरसेवक सध्या कोणार्क विकास आघाडीचे विलास आर. पाटील यांच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे. जर हे नगरसेवक फुटले, तर ''सेक्युलर फ्रंट''चे बहुमताचे स्वप्न अधुरे राहू शकते. : समाजवादी पक्षाच्या या अनपेक्षित भूमिकेमुळे भिवंडीच्या राजकारणात ''कोण कोणासोबत?'' याचा सस्पेन्स वाढला असून, सत्तास्थापनेचा चेंडू आता कोणाच्या मैदानात पडतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT