राष्ट्रीय स्पर्धेत पालघरची चर्चा
क्रीडाशिक्षक नीलेश गायकवाड यांचे यश
कासा, ता.१ (बातमीदार)ः राष्ट्रीय मास्टर्स गेम्स असोसिएशन, मास्टर गेम्स असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथील मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स अॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत कासा येथील क्रीडाशिक्षक नीलेश गायकवाड यांनी १०० मीटर हर्डल्स, उंच उडी प्रकारात रौप्य, कांस्य पदक पटकावले.
देशभरातील विविध राज्यांमधून सहभागी झालेल्या खेळाडूंमुळे स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली होती. अशा स्पर्धात्मक वातावरणात नीलेश गायकवाड यांनी दाखवलेली जिद्द, सातत्य आणि क्रीडाप्रेम विशेष उल्लेखनीय ठरले. या यशाच्या जोरावर थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मास्टर्स अॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली असून, पालघर जिल्ह्यासाठी ही बाब अभिमानाची मानली जात आहे. या कामगिरीतून ग्रामीण भागातील क्रीडाशिक्षक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करू शकतात हे अधोरेखित झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.