शाहू महाराजांचे थ्रीडी चित्र
प्रभादेवी, ता. ३१ (बातमीदार) : सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचा दीपस्तंभ ठरलेल्या राजर्षी शाहू महाराजांचे थ्रीडी चित्र चित्रकार शैलश आचरेकर यांनी साकारून इतिहासाशी जिवंत संवाद साधला आहे. अत्यंत बारकाईने आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने घडवलेले हे शिल्प पाहणाऱ्यांना अक्षरशः शाहू महाराजांच्या काळात घेऊन जाते.
चित्रकार शैलेश आचरेकर यांनी तब्बल दोन महिन्यांच्या परिश्रमानंतर ही कलाकृती पूर्ण केली. चित्रात शाहू महाराज राजस पोशाखात उभे आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील धैर्य, न्यायप्रियता आणि कर्तव्यदक्षतेचे दर्शन या चित्रातून घडते.
त्रिमितीय (थ्रीडी) तंत्रशैलीचा वापर करून ही चित्रकला शिल्पासारखी सजीव करण्यात आली आहे. पोशाखातील उठावदार घडणी, दागिन्यांतील सूक्ष्म बारकावे आणि पगडीवरील नक्षीकाम यामुळे हे चित्र हुबेहूब भासते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.