मुंबई

शहरात १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन उभारले जाणार

CD

शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स
महापालिकेचा रखडलेला प्रस्ताव अखेर मार्गी

ठाणे, ता. ३१ : ठाणे महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला चालना देण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला चार्जिंग स्टेशन्सचा प्रस्ताव अखेर मार्गी लागला आहे. येत्या काही महिन्यांत ठाण्यातील विविध १९ मोक्याच्या ठिकाणी सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत.

प्रकल्प ‘सार्वजनिक-खासगी भागीदारी’(पीपीपी) तत्त्वावर राबवला जाणार आहे. यासाठी सुमारे १० कोटी ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, हा संपूर्ण खर्च खासगी ठेकेदार करणार आहे. या प्रकल्पातून मिळणाऱ्या नफ्यातील १० टक्के हिस्सा महापालिकेला मिळेल. तसेच महापालिकेला किमान एक रुपया प्रतियुनिट दराने महसूल मिळणार आहे. ६ मे २०२५ रोजी या प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला असून, १० वर्षांच्या कालावधीसाठी ही जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. चार्जिंगचे दर केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार असतील.

ठेकेदाराची जबाबदारी
चार्जिंग स्टेशन्सची उभारणी, त्याचे संचालन, नियमित देखभाल, वीजजोडणी आणि सुरक्षेची सर्व जबाबदारी संबंधित निविदाधारकावर असेल. विशेष म्हणजे, या स्टेशन परिसरात कोणत्याही व्यावसायिक जाहिराती करण्यास मनाई करण्यात आली आहे.

येथे असणार चार्जिंग स्टेशन्स
नौपाडा-कोपरी : मनोरुग्णालय चौक, कशिश पार्क सेवा रस्ता.
उथळसर : वृंदावन बस स्टॉप, कचराळी तलाव, आकाशगंगा - राबोडी.
वागळे : रोड क्रमांक २२, पासपोर्ट कार्यालयाजवळ
लोकमान्य सावरकर नगर : लोकमान्य बस डेपो जंक्शन, पोखरण रोड क्र. १, देवदया नगर.
वर्तक नगर : पोखरण रोड क्र. २, गांधी नगर जंक्शन, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळ.
माजिवडा-मानपाडा : आनंद नगर बस स्टॉप, पातलीपाडा, यूआरसीटी जंक्शन, धर्माचा पाडा.
कळवा : खारेगाव सेवा रस्ता (९० फूट रोड), खारेगाव टोलनाका, आत्माराम चौक.
मुंब्रा व दिवा : मुंब्रा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि दिवा येथील आयुष्यमान आरोग्य केंद्र.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dirty City Controversy : पुणे घाणेरडे शहर, बिल गेट्सच्या माजी सल्लागाराने व्यक्त केलेला तिरस्कार, एपस्टीन फाइल्समध्ये धक्कादायक खुलासा

लग्नानंतर 14 वर्षांनी सुपरस्टार अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा; पत्नीने दिला जुळ्या मुलांना जन्म

प्रफुल पटेल NCP अध्यक्ष झाले हे कुणी सांगितलं? पियूष गोयल यांनी स्पष्टीकरण देत व्यक्त केली दिलगिरी

Horoscope : नवा आठवडा, नवी खुशखबर! उद्यापासून 'या' 5 राशींना धनलाभ योग; पूर्ण होतील रखडलेली कामे

Latest Marathi News Union Budget 2026 Live : आजच्या अर्थसंकल्पामुळे लोकल टू ग्लोबल होण्यास मदत होईल - पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT