खोपोलीत खाद्यतेल कारखान्याला १७ लाखांचा गंडा
खालापूर, ता. ३१ (बातमीदार) ः खोपोली येथील खाद्यतेल निर्मिती क्षेत्रातील फ्रिगोरीफिको अलाना प्रा. लि. या कंपनीत तब्बल १७ लाख रुपये किमतीच्या खाद्यतेलाचा अपहार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एका ट्रकचालकाने खाद्यतेलाचा ट्रक लंपास केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी खोपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, ही घटना २७ जानेवारी ते ३० जानेवारीदरम्यान घडली. एका अनोळखी ट्रकचालकाने स्पेक्ट्रा लॉजिस्टीक सोल्युशन ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधून मालवाहतुकीसाठी फ्रिगोरीफिको अलाना कंपनीचा विश्वास संपादन केला. कंपनीने त्या चालकावर विश्वास ठेवत ट्रकमध्ये १६ लाख ९४ हजार ५३६ रुपये किमतीचे खाद्यतेलाचा माल भरला. मात्र, हा माल निश्चित स्थळी पोहोचवण्याऐवजी चालकाने तो परस्पर लंपास केला. या वेळी ट्रकला लावलेली नंबर प्लेटही बनावट असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित गडदे हे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.