मुंबई

जुन्या जीर्ण बसस्थानकांमुळे बेलापूरमधील नागरिक त्रस्त

CD

जुन्या जीर्ण बस स्थानकांमुळे बेलापूरमधील नागरिक त्रस्त
अत्याधुनिक बस स्थानके उभारण्याची मागणी
बेलापूर, ता. ३१ (बातमीदार)ः नवी मुंबईसारख्या स्मार्ट शहरात सर्व सोयीसुविधा उपलब्ध असून, मागील काही वर्षांत टप्प्याटप्प्याने बस स्थानकेदेखील अत्याधुनिक करण्यात आली आहेत. मात्र, बेलापूर सेक्टर १,२ येथील काही बस स्थानके आजही जुन्या, जीर्ण अवस्थेत असून, असुविधांमुळे नागरिकांना रस्त्यावर उभे राहत बस पकडावी लागत आहे.
बेलापूर येथील नागरिकांना बस सुविधा सलग असल्याने नागरिकांचा मोठा कल बस प्रवासाकडे असतो. मात्र, बेलापूर परिसराअंतर्गत धावणाऱ्या बस नियमित अधिक संख्येने असल्या तरी, प्रवासादरम्यान जुन्या, जीर्ण, मोडकळीस आलेली आसने यांमुळे बस स्थानके असुविधांची ठरत आहेत. दरम्यान, इतरत्र डिजिटल पद्धतीची आलिशान बस स्थानके असताना बेलापूर परिसरातील काही बस स्थानके मात्र असुविधांचे माहेरघर ठरत आहेत. परिणामी, बेलापूर येथील सेक्टर १,२ परिसरातील जुनी बस स्थानके काढून नवी अत्याधुनिक बस स्थानके उभारण्याची मागणी नागरिक करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

Gas Cylinder Seized : साठेबाजाकडून १९ गॅस सिलिंडर जप्त; ‘सकाळ’च्या वृत्तानंतर पथकाची धडक कारवाई

मी काही बोलत नाही, याचा अर्थ...! गौतम गंभीर संतापला; रोहित, विराटचा अप्रत्यक्ष उल्लेख, भारताच्या 'कसोटी' कामगिरीवर केले भाष्य

Baramati News : बारामतीच्या शासकीय वैदयकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचेच नाव कायम; राज्य शासनाने घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT