मुंबई

महाराष्ट्राच्या रणरागिनींच्या जयंतीनिमित्त स्त्रीमुक्ती महिना उत्साहात

CD

महाराष्ट्राच्या रणरागिनींच्या जयंतीनिमित्त स्त्रीमुक्ती महिना उत्साहात
खारघर, ता. ३१ (बातमीदार) : महाराष्ट्रातील समाजसुधारणेच्या रणरागिनींच्या जयंतींचे औचित्य साधत युवा संस्था व नवयुवा फेडरेशन यांच्या वतीने ३ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत स्त्रीमुक्ती महिना मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत स्त्रीशक्तीचा जागर घालणारे विविध सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे, फातिमा शेख, राजमाता जिजाऊ व माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतींच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात येत असून, नवी मुंबईतील नवयुवा शहरस्तरीय संघ व दीडशेहून अधिक बचत गट सहभागी झाले आहेत. सानपाडा सेक्टर १० येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता भवन येथे झालेल्या कार्यक्रमात १५ बचत गटांतील १२० महिला सहभागी झाल्या.
या वेळी विधवा व एकल महिलांचा आभूषण देऊन सत्कार करण्यात आला. सुकन्या जाधव, शांताताई व डॉ. हर्षा गोयल यांनी मार्गदर्शन केले, तर सुजित निकाळजे यांनी समाजसुधारकांच्या कार्यावर प्रकाश टाकला. स्त्रीशक्ती, समता व सामाजिक जागृतीचा संदेश देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT