हँकॉक पुलाची रखडपट्टी
बाधितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ ः हॅंकॉक पुलाच्या बाजूला असलेल्या म्हाडाच्या इमारतीतील बाधित व्यावसायिक गाळेधारक आणि भाडेकरूंच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असल्याने पुलाचे काम रखडले आहे. म्हाडा आणि महापालिकेच्या समन्वयातून याप्रकरणी निघणाऱ्या तोडग्याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.
मध्य रेल्वेच्या भायखळा आणि सँडहर्स्ट रोड स्थानकादरम्यान हँकॉक पुलाची पुनर्बांधणी पूर्ण झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंच्या पोहोच रस्त्यांची कामे अंशत: पूर्ण झाली आहेत. उड्डाणपुलाच्या पूर्वेकडील काही वाणिज्यिक आस्थापना बाधित होत आहेत. त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया प्रलंबित आहे. त्याबाबत संबंधित पालिका प्रशासकीय विभाग आणि म्हाडाच्या समन्वयातून निघणाऱ्या तोडग्याकडे बाधितांचे लक्ष लागले आहे. उर्वरित कामांसाठी निविदा काढावी लागणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
स्थगिती आदेश हटविणार
पालिका प्रशासन आणि म्हाडा प्रशासन यांनी आपापल्या धोरणानुसार त्यावर तोडगा काढला जाईल. काही भाडेकरूंनी माननीय उच्च न्यायालयात प्रकरण नेले. त्यावर माननीय न्यायालयाने स्थगिती आदेश दिले आहेत. हे स्थगिती आदेश हटविण्यासाठी विधीज्ञांची मदत घेतली जात असल्यचाी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.