मुंबई

राज्यात उभारणार दोन थोरियम वीज प्रकल्प

CD

राज्यात उभारणार दोन थोरियम वीज प्रकल्प
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : विजेच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर थोरियम इंधनावर चालणारा वीज प्रकल्प उभारण्याच्या राज्य सरकारच्या हालचाली सुरू आहेत. सुमारे १,९८० मेगावाॅट क्षमतेचे हे दोन प्रकल्प असणार आहेत. हे प्रकल्प कार्यन्वित झाल्यानंतर त्यामधून सुमारे ३.५० रुपये प्रति युनिट दराने वीज उपलब्ध होणार असल्याचे समजते.

राज्यात सध्या औष्णिक वीज प्रकल्पातून वीजनिर्मिती करताना मोठ्या प्रमाणात कोळसा जाळावा लागत असल्याने वायू प्रदूषण होते. त्यामुळे ऊर्जा विभागाकडून प्रदूषणरहित वीज प्रकल्प उभारण्यावर भर दिला जात आहे. त्याचाच भाग म्हणून १,५४० आणि ४४० मेगावाॅट क्षमतेचे दोन वीज प्रकल्प उभारण्याची योजना आहे. थोरियमवर चालणारे हे वीज प्रकल्प उभारण्याची सरकारची योजना असल्याचे ऊर्जा विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यासाठी रशियाचे सहकार्य घेतले जाणार आहे. प्रस्तावित प्रकल्प सध्याच्या जुन्या झालेल्या औष्णिक वीज प्रकल्पाच्या ठिकाणी उभारला जाणार आहे. दरम्यान, थोरियमवर चालणारे वीज प्रकल्प अणुऊर्जा प्रकल्पाच्या क्षमतेने सुरक्षित समजले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

Numerology : 'या' 3 मूलांकाचे लोक सगळ्यात जास्त खोटं बोलतात; स्वार्थापायी करतात दुसऱ्यांचे नुकसान, सहज कुणालाही फसवण्याची वृत्ती

गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती; डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा, ‘महानगर गॅस’च्या नावाने फसवणूक

BMC रोज पाणीपुरवठा करते, तरीही मुंबईला पाणी कमी का पडते? मोठे स्पष्टीकरण देत महायुती सरकारने सांगितली खरी कारणे

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

SCROLL FOR NEXT