मुंबई

भारताचे २३ तर बांग्लादेशच्या १२८ मच्छीमारांची मुक्तता

CD

भारताचे २३ तर बांगलादेशच्या १२८ मच्छीमारांची मुक्तता
पाकिस्तानातील भारतीय मच्छीमार कधी मुक्त होणार

पालघर, ता. ३१ ः भारत आणि बांगलादेशच्या मच्छीमारांच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल केंद्र सरकारने उचलले आहे. मासेमारी करताना चुकून सागरी सीमा ओलांडल्याने ताब्यात घेतलेल्या व राष्ट्रीयत्व सिद्ध झालेल्या मच्छीमारांची मुक्तता दोन्ही देशांनी केली आहे. साधारणपणे दोन-तीन दिवस आधी बांगलादेशने सर्व २३ भारतीय मच्छीमार, तर भारताने १२८ बांगलादेशी मच्छीमारांची मुक्तता केली. ही माहिती शांततावादी कार्यकर्ते जतीन देसाई यांनी दिली आहे. हे मच्छीमार आपापल्या मायदेशी परतल्याने त्यांच्या कुटुंबीयात आनंद व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे भारतातील तब्बल १९८ मच्छीमार-खलाशी गेल्या तीन-चार वर्षांपासून पाकिस्तानी तुरुंगात असल्याने त्यांच्या कुटुंबीयांची दैनावस्था झाली आहे.
मासेमारी करताना भारत आणि बांगलादेशाची आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडल्याने मासेमारी नौका आणि त्यावरील मच्छीमार-खलाशी यांना दोन्ही देशांच्या सीमा सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले होते. हे मच्छीमार दोन्ही देशांच्या तुरुंगात ठेवण्यात आले. मच्छीमारांचे राष्ट्रीयत्व सिद्ध झाल्यानंतर आणि त्यांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर मच्छीमार-खलाशी यांना सोडण्याची किंवा मायदेशी परत पाठविण्याची तरतूद दोन देशांच्या करारानुसार आहे. त्याप्रमाणे बांगलादेशने २३ तर भारताने १२८ मच्छीमारांची मुक्तता केली. मच्छीमारांसह भारताने पाच बांगलादेशी मासेमारी बोटी परत केल्या आणि बांगलादेशने दोन भारतीय बोटी परत केल्या. ही देवाणघेवाण बंगाल उपसागरातील आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेवर झाली.

अडथळ्यांमुळे अद्याप सुटका नाही
सध्या पाकिस्तानच्या विविध तुरुंगांमध्ये महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामधील १९ मच्छीमारांसह भारताचे एकूण १९८ मच्छीमार कैदेत आहेत. मासेमारी करताना चुकून पाकिस्तान हद्दीत गेल्याने त्यांना पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणाकडून अटक करण्यात आली आहे. यातील बहुतांश मच्छीमारांची शिक्षा दोन ते तीन वर्षांपूर्वीच पूर्ण झाली आहे. मात्र, प्रशासकीय विलंब, कागदपत्रांची पूर्तता आणि राजनैतिक प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे त्यांची सुटका अद्याप झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा भारतावर परिणाम! तेलापासून मसाल्यांपर्यंत अनेक वस्तू महाग, जाणून घ्या यादी...

Latest Marathi News Live Update : रिसोड शहरालगत असलेल्या पावर हाऊस परिसरातील खुल्या जागेत लागली आग

Holi 2026: मुख्यमंत्री निवासात होळीचा थाट! फुलांच्या वर्षावात साजरी झाली रंगपंचमी; मयूर नृत्य आणि पारंपरिक गाण्यांनी लुटला आनंद

Nashik Car Accident : सार्थकच्या जाण्याने आईचा आधार हरपला; वडिलांचे कोरोनात निधन, आता एकुलता एक मुलगाही गेला

गॅस बंद करायला विसरली आणि आगीचा भडका उडाला ; जीवानिशी वाचलेली मराठी अभिनेत्री

SCROLL FOR NEXT