दहावी व्याख्यानमालाचा उत्साहात समारोप
तुर्भे, ता. ३१ (बातमीदार) : डी. आर. पाटील व भोलानाथ पाटील यांच्या स्मरणार्थ गेल्या १९ वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या शैक्षणिक व्याख्यानमाला–२०२६चा सांगता समारंभ शनिवारी डॉ. सी. व्ही. सामंत विद्यालयाच्या श्री रामतनू माता सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. मंगळवार, ता. २७ पासून सुरू झालेल्या या व्याख्यानमालिकेत तुर्भे व कोपरी विभागातील सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
आठवडाभर चाललेल्या या उपक्रमात तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांनी अभ्यासाचे तंत्र, परीक्षेची तयारी, वेळेचे नियोजन तसेच मानसिक तणावावर मात करण्याबाबत मार्गदर्शन केले. सांगता समारंभास माजी नगरसेवक व माथाडी कामगार नेते चंद्रकांत पाटील, नवनिर्वाचित नगरसेविका कविता पाटील, नगरसेविका शुभांगी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ही व्याख्यानमाला अत्यंत उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले. आयोजकांनी पुढील वर्षीही ही शैक्षणिक परंपरा अधिक व्यापक स्वरूपात सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.