मुंबई

उपनगरी रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जेला प्राधान्य

CD

उपनगरी रेल्वे स्थानकांवर सौरऊर्जेला प्राधान्य
‘एमआरव्हीसी’चा पुढाकार; मिरा रोड, विरार, पालघर आणि नेरळ येथे उभारणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) उपनगरी रेल्वे स्थानकांवरील वाढत्या विजेची मागणी लक्षात घेऊन सौरऊर्जेचा प्रभावी वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मिरा रोड, विरार, पालघर आणि नेरळ या चार रेल्वे स्थानकांवर ग्रिड-कनेक्टेड सौरऊर्जा प्रणाली बसवली जात आहे. सुमारे ५.३४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून साकार होणाऱ्या या प्रकल्पाची एकूण क्षमता १,२५० किलोवॉटपेक्षा अधिक आहे.

रेल्वे स्थानकांवरील सौर प्रकल्पांमधून दररोज सुमारे पाच हजार युनिट वीजनिर्मिती अपेक्षित असून, त्यामुळे एमआरव्हीसीला वार्षिक अंदाजे १.५ कोटी रुपयांची वीज खर्चात बचत होणार आहे. स्थानकांवर सुरू असलेल्या पायाभूत सुविधा वाढीमुळे विजेची मागणी वाढत असून, त्याची भरपाई करण्यासाठी अक्षय ऊर्जेचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. ‘एमआरव्हीसी’कडून सुरू असलेल्या स्थानक सुधारणा कामांमध्ये एलिव्हेटेड डेक, नवीन व सुधारित पादचारी पूल, सरकते जिने, उद्‍वाहन, अद्ययावत तिकीट कार्यालये आणि प्रवासी सुविधांचा समावेश आहे. या सर्व कामांसोबतच सौरऊर्जा प्रकल्पांची अंमलबजावणी केली जात आहे. यामध्ये मिरा रोड स्थानकावर सध्या कार्यरत १०० किलोवॉट क्षमतेत आणखी १२० किलोवॉटची भर घालण्यात येणार आहे. विरार येथे ४७५ किलोवॉट, पालघर येथे १९० किलोवॉट, तर नेरळ स्थानकावर ४६५ किलोवॉट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारला जाणार आहे.

पर्यावरणपूरक स्थानके
सौर प्रकल्पांमुळे कार्बन उत्सर्जनात घट होऊन जीवाश्म इंधनावर आधारित विजेवरील अवलंबित्व कमी होणार आहे. तसेच सुमारे चार वर्षांत प्रकल्पाचा भांडवली खर्च वसूल होईल, असा अंदाज आहे.  रेल्वे एनर्जी मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून काम पाहात आहे. एमआरव्हीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास सोपान वाडेकर यांनी या उपक्रमामुळे उपनगरी रेल्वे स्थानके अधिक पर्यावरणपूरक आणि प्रवासी अनुकूल बनतील, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

Latest Marathi News Live Update : नवी मुंबईत घरगुती गॅस टंचाई

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

Teacher Cyber Fraud Case : तुमच्या मोबाईलवरही असा व्हिडिओ कॉल येतोय? CBI अन् पोलिसांच्या नावाने निवृत्त शिक्षकाला घातला 59 लाखांचा गंडा, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT