मुंबई

भाज्यांचे भाव बाजारात गडगडले

CD

भाज्यांचे भाव बाजारात गडगडले
नाशिक, गुजरातमधून आवक वाढल्याचा परिणाम
कासा, ता. १ (बातमीदार)ः पालघर जिल्ह्यात नाशिक, गुजरात येथून मोठ्या प्रमाणात भाजीपुरवठा होत असल्याने बाजारातील आवक वाढली आहे. परिणामी, मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाल्याने भाव कोसळले आहेत.
भाज्या स्वस्त झाल्याने गृहिणींच्या चेहऱ्यावर आनंद झळकत आहे. पूर्वी मोजक्या प्रमाणात भाजी घेणारे ग्राहक आता किलोने खरेदी करताना दिसत आहेत. मेथी व पालक यांसारख्या पालेभाज्या १० ते १५ रुपये जुडी भावाने मिळत असून, कोथिंबीर १० ते १२ रुपये भावाने उपलब्ध आहे. मागील महिन्यात महाग असलेले टोमॅटो, मटार, आले आणि गवार यांचे भाव आता २० ते ३० रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. कांदा, बटाटा आणि लसणाचे भाव घसरले आहेत. त्यामुळे फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, पण भाव घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. उत्पादनखर्चही निघत नसल्याची खंत अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत.
---------------------
घाऊक बाजारात सध्याचे भाव (प्रति किलो/जुडी):
वांगी : १५ ते २०
टोमॅटो : १५ ते ३०
भेंडी : २० ते २५
कारली : २० ते २५
गवार : २० ते २५
काकडी : २०
मटार : २५ ते ३५
वाल पापडी : २५ ते ३०
शेवगा (जुडी) : १५ ते २०
-------------------------------
सध्या विविध भाज्यांची लागवड करून उत्पादन घेत आहोत, पण भाव खूपच कमी मिळत आहेत. मेहनत व मजुरीचा खर्चही निघत नाही. त्यामुळे मोठे संकट उभे राहिले आहे.
- जयप्रकाश कोदे, शेतकरी
-----------------
गेल्या काही दिवसांत भाजीपाला मोठ्या प्रमाणात येत असल्याने खूप स्वस्त मिळत आहे. याचा गृहिणींना फायदा होत आहे.
- एस. खान, भाजीविक्रेता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांना म्हाडातून लागलं घर, पण प्रकरण हायकोर्टात; काय दिले निर्देश?

Sant Tukaram Maharaj Beej 2026: संत तुकाराम बीज का साजरी केली जाते अन् तुम्हाला या दिवसाचं महत्त्व माहित आहे का?

Two Killed Electric Shock Hupari : बैलांचा नाद, जिवापाड प्रेम करणाऱ्यारा बैलांना धुताना विजेचा धक्का लागला अन्, हुपरीत दोघांचा जागीच मृत्यू

Nashik Kumbh Mela : 1800 झाडांची कत्तल थांबणार? हायकोर्टाने नाशिक महापालिकेचा 'तो' युक्तिवाद फेटाळला; नेमकं काय घडलं न्यायालयात?

Latest Marathi News Live Update : देहूनगरीत आज संत तुकाराम महाराज यांचा 378 वा बीज सोहळा

SCROLL FOR NEXT