मुंबई

आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

CD

विज्ञानाच्या प्रयोगातून मांडले प्रगत तंत्रज्ञान
डोंबिवलीत आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
डोंबिवली, ता. १ (बातमीदार): कल्याण-डोंबिवली परिसरातील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी २९ आणि ३० जानेवारी रोजी डोंबिवली पूर्वेतील ‘रीजन्सी अनंतम’ येथे भव्य आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण होईल आणि भविष्यात हेच विद्यार्थी नासा किंवा इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून देशाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास आयोजक संतोष डावखर यांनी या वेळी व्यक्त केला.

४५ हून अधिक शाळांचा सहभाग
यंदाच्या विज्ञान मेळाव्यात ४५ हून अधिक शाळांनी आपला सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता), सौरऊर्जा, रोबोटिक्स आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या आधुनिक विषयांवर आधारित नावीन्यपूर्ण प्रयोग सादर केले. उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांना एकूण दीड लाख रुपयांची रोख रक्कम, पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

विविध प्रदर्शनांची मेजवानी
२०१४ पासून संतोष डावखर आणि त्यांचे सहकारी सातत्याने अशा उपक्रमांचे आयोजन करत आहेत. यंदा विज्ञानासोबतच ऐतिहासिक मुद्रांक, दुर्मिळ कागदपत्रे, नाणी आणि चलनी नोटांचे प्रदर्शनही भरवण्यात आले होते. या प्रदर्शनासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश देण्यात आला होता, तसेच शाळांतील विद्यार्थ्यांसाठी खास बससेवाही उपलब्ध करून देण्यात आली होती.

रीजन्सी ग्रुपचे सहकार्य
गेल्या अनेक वर्षांपासून रीजन्सी ग्रुपच्या सहकार्याने हे प्रदर्शन यशस्वी होत असून, दरवर्षी २५ हजारांहून अधिक विद्यार्थी या उपक्रमाला भेट देतात. यंदाही विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी हे व्यासपीठ अत्यंत उपयुक्त ठरत असल्याची भावना शिक्षक आणि पालकांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FACT CHECK : पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर ICC कडून एका वर्षाच्या बंदीची कारवाई? PSL वर बंदी, महसूलात कपात अन् बरंच काही...

Pune BJP Respects Ajit Pawar : पुण्याच्या महापौर-उपमहापौर निवडीनंतर भाजप जल्लोष करणार का? अजित पवारांच्या निधनामुळे घेतला मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अस्थिकलश सांगलीमध्ये दाखल

Who is Parshuram Wadekar? : कोण आहेत पुण्याचे उपमहापौर परशूराम वाडेकर? धीरज घाटे यांनी केली घोषणा!

"मला एकही फोन न करता देवाघरी गेली" प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला मातृशोक ; दोन महिन्यापूर्वीच झालेलं लग्न

SCROLL FOR NEXT